रायगड मी मराठी प्रतिष्ठान व माजी विद्यार्थी यांचा स्तुत्य उपक्रम....शाळांना महा पुरुषांच्या प्रतिमा प्रदान
रायगड मी मराठी प्रतिष्ठान व माजी विद्यार्थी यांचा स्तुत्य उपक्रम....शाळांना महा पुरुषांच्या प्रतिमा प्रदान
माणगाव (प्रतिनिधी)
या शाळेच्या कणाकणाशी जडले माझे नाते | काशी माझी हीच | रामेश्वरही येथे || या विचाराला स्मरून विद्यार्थ्यांनी दिनांक 03 जून 2020 रोजी रायगड जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळाने अक्षरशः होत्याच न्हवत केल यामध्ये सार्वजनिक मालमतेसह शाळांचीही दुरवस्था झाली त्यामधे शाळेतील महापुरुषांच्या प्रतिमा मोडून पडल्या अशा वेळेस आज दिनांक -23.01.2022 रोजी रा. जि. प शाळा मांजरवणे मराठी निगूडमाळ तसेच सरस्वती विद्या मंदिर वडघर मुद्रे ता. माणगाव येथे सरस्वती विद्या मंदिर शाळेतील माजी विद्यार्थी व रायगड मी मराठी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने 32 महापुरुष प्रतिमा प्रदान कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमासाठी निगूडमाळ शाळेचे शिक्षक कुलकर्णी सर,निगूडमाळ गावचे माजी अध्यक्ष श्री.गणू ठसाळ सरस्वती विद्या मंदिरचे शिक्षक श्री. भेदाटे सर, पाटील सर, पवार सर, राजन पाटील सर, भिवा पवार सर, प्रमुख पाहुणे मा. श्री. प्रकाश धुमाळ साहेब समाजसेवक, अशोक कांबळे तसेच रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगडचे संस्थापक आदेश लाड, अध्यक्ष समीर टाकले, माणगाव शाखा अद्यक्ष आनेश खेडेकर मार्गदर्शक रुपेश दर्गे सल्लागार विठोबा महाडीक, सुजीत गोरीवले उपस्थित होते.
सामाजिक कार्य करणारे आज फार कमी पाहायला मिळतात मात्र रायगड मी मराठी प्रतिष्ठान व माजी विद्यार्थ्यांनी आजही आपल्या शाळेबद्दल असणारे प्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपली आहे. या सामाजिक कार्यबदल सर्वत्र संस्थेची वाहवा झालेली पाह्यला मिळत आहे.
Comments
Post a Comment