विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केले बाळशास्त्री जांभेकर याना विनम्र अभिवादन

विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केले बाळशास्त्री जांभेकर याना विनम्र अभिवादन पनवेल : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्त पनवेल तालुका पत्रकार महासंघ आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती यांच्या तर्फे आयोजित कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी भेट देऊन सर्व पनवेलमधील परखड आणि नि:पक्ष लेखणीने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकार बंधूंना शुभेच्छा दिल्या. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती यांच्या मार्फत आयोजित पुरस्कार सोहळ्यात जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे सामाजिक कर्तव्याचे भान राखत अखंडीत प्रवासाची दखल घेऊन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती मार्फत विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेला समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जगातील सर्वात कमी उंची असणारे बॉडीबिल्डर प्रतिक मोहिते याचे देखील विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार झाले व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या सन्माननीय सदस्यांना गौरविण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर