लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन पनवेल(प्रतिनिधी) सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या 'लोकनेते रामशेठ ठाकूर भवन' चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. सोमवार दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता हा समारंभ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था हि स्वतःची शैक्षणिक संस्था असली तरी त्यांचे रयत शिक्षण संस्थेवर त्यांचे जीवापाड प्रेम आहे, त्यामुळे रयत संस्थेला मातृसंस्था मानून ते सदैव कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेला जेव्हा-जेव्हा गरज पडली तेव्हा लोकनेते रामशेठ ठाकूर मदतीला धावून आले. रयतेच्या विकासात