Posts

Showing posts from November 27, 2021

जनजागरण रथयात्रेस उदंड प्रतिसाद

Image
  जनजागरण रथयात्रेस उदंड  प्रतिसाद पनवेल(प्रतिनिधी)  ओबीसी जागर अभियान अंतर्गत भाजप उत्तर रायगड व पनवेल शहर ओबीसी मोर्चातर्फे जनजागरण रथयात्रेचे आयोजन रविवारी पनवेलमध्ये करण्यात आले होते. भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते या रथयात्रेस शुभारंभ झाला. या  जनजागरण रथयात्रेस नागरिकांचा उदंड  प्रतिसाद मिळाला.               ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ठाकरे सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. सरकारने केवळ तात्पुरता अध्यादेश काढून ओबीसी समाजाची दिशाभूल चालवली आहे. हे सरकार ओबीसी समाजाबाबत उदासीन आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे राज्य मागास आयोगाची या सरकारने केलेली दुर्दशा. ओबीसी समाजाला गृहित धरले जात आहे. या वेळी जर ओबीसी समाज एकत्र आला नाही, तर ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपून जाईल आणि सामाजिक अस्तित्वदेखील धोक्यात येईल. त्यामुळे ओबीसी समाजाने एकत्र यावे यासाठी हे अभियान राबवले जात आहे.            यावेळी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्

जयेश चौधरी याने ब्राँझ मेडल पटकावून आपल्या पनवेलचे नाव राज्य स्तरावर,जे.एम.म्हात्रे यांनी त्याचे केले अभिनंदन

Image
  जयेश चौधरी याने ब्राँझ मेडल पटकावून आपल्या पनवेलचे नाव राज्य स्तरावर,जे.एम.म्हात्रे यांनी त्याचे केले अभिनंदन  पनवेल : थाई बॉक्सिंग इंडियन फेडरेशनच्या मार्फत गोवा येथे  12 वी राष्ट्रीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2021 आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये आपल्या पनवेलमधील आठ वर्षीय कु. रुद्र जयेश चौधरी याने ब्राँझ मेडल पटकावून आपल्या पनवेल चे नाव राज्य स्तरावरती नेले. या केलेल्या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक करण्यासाठी पनवेलचे मा.नगराध्यक्ष श्री.जे.एम.म्हात्रे साहेब यांनी त्याचे अभिनंदन केले यावेळी तेथे विरोधी पक्षनेते श्री.प्रीतम जनार्दन म्हात्रे, जे.एम.म्हात्रे इन्फ्रा प्रा. लि. चे डायरेक्टर श्री.अनंतशेठ म्हात्रे आणि श्री विजयशेठ म्हात्रे उपस्थित होते. यावेळी त्याच्या पुढील वाटचालीस श्री.प्रितमदादा म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच यापुढे त्याला कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी आपली जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था नेहमी त्याच्या सोबत आहे असे त्याच्या पालकांना सांगितले.

वडाळे तलावा संदर्भात केलेल्या सूचनांचा विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी घेतला आढावा.."सायंकाळच्या वेळेस नागरिकांची साधला संवाद"

Image
  वडाळे तलावा संदर्भात केलेल्या सूचनांचा विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी घेतला आढावा.."सायंकाळच्या वेळेस नागरिकांची साधला संवाद" पनवेल : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे यांनी वडाळे तलाव येथील सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला होता त्यावेळी तेथे सुरू असलेल्या कामातील निकृष्ट दर्जा बद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्या दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे ,नगरसेविका सौ प्रीती जॉर्ज यांनी भेट दिली. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे अभियंता श्री संजय कटेकर आणि श्री गावडे उपस्थित होते.         यावेळी तिथे सफाई नसल्यामुळे सदर ठिकाणी दिवसातून दोन वेळा स्वच्छता करण्यात यावी असे सांगितले. काही ठिकाणी ट्रॅकवर साचलेले पाणी निघण्यासाठी पाण्याचे पाईप जमिनीपासून दोन इंच वर आहेत ही गोष्ट अभियंता यांच्या निदर्शनास आणली. सदर ठिकाणी नागरिकांचा वावर सुरू झाल्यामुळे त्या ठिकाणी लवकरात लवकर  कचरा कुंडी बसवण्यात यावी असे सुचविले. बऱ्याच ठिकाणी भरलेल्या सांध्यांना क्रॅक आलेले आहे. काही दिवसांन

केंद्रीय मंत्री कपिल पाटील शुक्रवारी मोहोपाड्यात पाणी परिषदेला करणार मार्गदर्शन

Image
केंद्रीय मंत्री कपिल पाटील शुक्रवारी मोहोपाड्यात  पाणी परिषदेला करणार मार्गदर्शन  पनवेल(प्रतिनिधी) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत 'हर घर नल हर घर जल' या मोहिमे अंतर्गत शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजता मोहोपाडा मैदानावर केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीतीत पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.         या सोहळ्यास प्रमुख मान्यवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, उरण तालुका अध्यक्ष रवि भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे,  उपस्थित राहणार आहेत.              वासांबे, पुनाडे आठगाव पूर्व विभाग आणि चाणजे या परिसरातील गावांकरिता पाण्याची दीर्घकालीन पाणी योजना राबविण्याच्या दृष्टिकोनातून या पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी कार्यकर्ते व नागरिका

'भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार, मार्च-एप्रिलमध्ये नवे सरकार' # मार्च किवा एप्रिलमध्ये राज्यात सत्ता बदल होईल, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

Image
' भाजप - शिवसेना पुन्हा एकत्र येणार , मार्च - एप्रिलमध्ये नवे सरकार '    राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही . अडीच वर्ष पूर्ण होताच पुन्हा शिवसेना आणि भाजप एकत्र येतील . मार्च किवा एप्रिलमध्ये राज्यात सत्ता बदल होईल , असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री   रामदास आठवले   यांनी केले . ते आज सांगलीत पत्रकारांशी बोलत होते . केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री   नारायण राणे   यांनी केलेल्या सत्ताबदलाच्या वक्तव्याला आठवले यांनी दुजोरा दिला . केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत . यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींसह दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य केले . नारायण राणे यांनी मार्च २०२२ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार जाईल , असे भाकीत काल केले आहे . त्याबद्दल विचारणा केली असता रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली . नारायण राणे यांचे वक्तव्य बरोबर आहे . महाविकास आघाडीचे सरकार र