अपहरण केलेल्या मुलाची अवघ्या 4 तासाच्या आत करण्यात आली सुटका
अपहरण केलेल्या मुलाची अवघ्या 4 तासाच्या आत करण्यात आली सुटका पनवेल, दि.24 (संजय कदम) ः एका 6 वर्षीय मुलाची त्याच्याच नात्यातील माणसांनी लग्नाला विरोध केला म्हणून अपहरण केले होते. परंतु खांदेश्वर पोलिसांनी अवघ्या 4 तासात सदर मुलाला मुंबई सेेंट्रल रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेवून अपहरणकर्त्यांकडून त्याची सुटका केली आहे. यावेळी त्या मुलाच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. तक्रारदार विनय गामा सिंग, वय 39 वर्षे, रा. विचूंबे, यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांची पत्नी सौ. पिंकी सिंग यांचे मोबाईलवर अज्ञात इसमाने सायंकाळी फोन करून व एसएमएसव्दारे धमकी दिली की, त्यांचा मुलगा यश, वय 6 वर्षे (नाव बदललेले आहे.) हा व त्यांची भाची महिला (21) हे आमच्या ताब्यात असून दहा लाख रूपये घेवून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे या, अन्यथा दोघांनाही ठार करू. तक्रारदार या दिलेल्या तकारीवरुन खांदेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस आयुक्त, नवी मुंबई, बिपिनकुमार सिंह, पोलीस सह आयुक्त, डॉ. जय जाधव, पोलीस उप आयुक्त,