अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिवेआगर सुवर्ण गणेश मुर्तीचा मुखवटा पुन्हा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न.
• अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिवेआगर सुवर्ण गणेश मुर्तीचा मुखवटा पुन्हा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न. • आजच्या सुवर्ण दिवसा मुळे दिवेआगर येथील पर्यटन क्षेत्राचा विकास होणार-- उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगर येथे अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुन्ह:प्रतिष्ठापना हस्ते पूजा संपन्न झाली. दिवेआगर येथील मंदीरातील गणेशाची सुवर्ण मुर्ती ही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू होते गेल्या ९ वर्षांपूर्वी ती चोरट्यांनी चोरली होती. यावेळी दोन सुरक्षा रक्षकांना आपला जीव गमावावा लागला होता. तेव्हापासुन दिवेआगर येथील महत्व काहीसं कमी झाल्याचे दिसून येत होते. दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली असून त्याच्या संरक्षणासाठी आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे जर कोणी सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची चोरी करायचा प्रयत्न केल्यास याठिकाणी असलेल्या आधुन