Posts

Showing posts from November 18, 2021

मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करावी - आमदार प्रशांत ठाकूर

Image
  मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करावी - आमदार प्रशांत ठाकूर                                                                                             पनवेल(प्रतिनिधी) केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात भापच्यावतीने आज (दि. १२) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा वर्षा नाईक, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, गौरव कांडपिळे, सुहासिनी केकाणे, अभिषेक भोपी,  यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.  तसेच यावेळी राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.        या

पनवेलमध्ये विकासाचा झंझावात

Image
  पनवेलमध्ये विकासाचा झंझावात  पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक विभागात विकासकामे करून शहरांसोबत गावांचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणाऱ्या तब्बल ३१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आज (दि. १५) झाले आहे.        भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, सुशिला घरत, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, बबन मुकादम, मनोहर म्हात्रे, राजू सोनी, मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, चारुशीला घरत, रुचिता लोंढे, निलेश बाविस्कर, माजी नगरसेवक श्रीकांत ठाकूर, सुहासिनी शिवणेकर, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, अतुल पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्

लीना गरड यांचे भाजपमधून निलंबन

  लीना गरड यांचे भाजपमधून निलंबन पनवेल(प्रतिनिधी) पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका लीना गरड यांचे भारतीय जनता पार्टीतून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.  पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर खारघर प्रभाग पाच मधून नगरसेविका म्हणून लीना गरड विजयी झाल्या. मात्र त्यांनी सतत उघडपणे पक्षविरोधी कारवाई केली आहे आणि तशा सातत्याने तक्रारी विभागातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पक्षश्रेष्टींकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी लीना गरड यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्या संदर्भात आज (दि. १६) निलंबन पत्र लीना गरड यांना पाठविण्यात आले आहे.         भाजपच्या नगरसेविका असतानाही लीना गरड यांनी महापालिकेच्या विविध सभांमध्ये विरोधी पक्षाला उघडपणे सहकार्य केले आहे. भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या असताना आपल्या स्वतःच्या खारघर फोरम या संस्थेला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी भाजपाला सातत्याने कमी लेखत भारतीय जनता पार्टीच्या शहरी व ग्रामिण कार्यकर्ते यांच

वाळवटी गणातून शिवसेना मुसंडी मारणार, शिवसेना शाखा प्रमुख कर्याकर्त्याची सभा.पक्ष बांधणीसाठी कार्यकर्ते एकवटले.

Image
वाळवटी गणातून शिवसेना मुसंडी मारणार, शिवसेना शाखा प्रमुख  कर्याकर्त्याची सभा.पक्ष बांधणीसाठी कार्यकर्ते एकवटले.  श्रीवर्धन- दिं १८ ऑक्टों २० २१ आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीमध्ये वाळवटी गणातून राष्ट्रवादीला जोरदार धक्का मिळणार असून शिवसेना संघटना पक्ष बांधणीसाठी कार्यकर्ते एकवटले आहेत मागिल  निवडणूकीत या गणातून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते , मात्र यावेळी माजी जि. प. सदस्य अविनाष कोळंबेकर हे शिवसेनेत स्वगृही परतले आरेत त्या मुळे कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत तालुका प्रमुख प्रतोषभाई कोलथरकर यांनी पक्षबांधणीसाठी कंबरकसली असून वाळवटी गणतून कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा हक्काचा उमेदवार निवडून आणणार असा चंग बांधला आहे याच उद्देशाने विभाग प्रमुख गाजानन कदम, गणपत सोलकर.पप्पू करदेकर, शरद महाडीक,युवा सेना अधिकारी ओमकार शेलार ,यांना सभेचे आदेश देऊन सभा आयोजित करणात आली. माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली  चिखलप येथिल चंडीकादेवी मंदिर सभागृह येथे वाळवटी गणातील शिवसेनेचे पदाधिकारी शाखा प्रमुख ,कार्यकर्ते यांची सभा आयोजित करण्यात आ

विषारी सर्प दंशाने तरूणाचा मृत्यू, श्रीवर्धन शहरातील दुर्दवी घटना.

Image
  विषारी सर्प दंशाने तरूणाचा मृत्यू, श्रीवर्धन शहरातील दुर्दवी घटना. श्रीवर्धन -दिं १४ ऑक्टों २०२१ (मंगेश निंबरे) बारावीत शिकत असलेल्या एका तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची श्रीवर्धन शहरात दुर्दवी घटना घडली आहे या बाबत सविस्त असे       श्रीवर्धन शहरातील गणेश आळी येथिल कु. रोषन सुरेंद्र चोगले वय १८ वर्षे हा दिं १३ आँक्टों २०२१रोजी रात्री  जेवण करून  १० : ३० वाजताच्या समारास रस्त्यावर फेरफटका मारण्या करीता गेला असता घरा पासून काही अंतरावर मुख्य रस्त्यावरुन जात होता  यावेळी  संपुर्ण तालुक्यात काहीकाळ विद्युत पुरवठा तांत्रिक अडचणीमुळे  खंडीत झाला होता   त्यामुळे  रस्त्यावर अंधार होता यावेळी  रोषन रस्त्यावरून चलला असताना त्याच्या पायाला विषारी सर्षाने दंश केला रोषनने वडीलांना हाक मारीत आरओरड करीत पळत आपल्या घराकडे परतला व साप चावल्याचे सांगितले  वडीलांनी ताबडतोब जवळ असलेल्या उपजिल्हा रूग्णालय श्रीवर्धन येथे घेऊन गेले व दाखल केले डॉ मधुकर ढवळे यांनी त्वरीत उपचार सुरु केले मात्र उपचार सुरु असताना काही वेळातच रात्री ११ : ३० वाजताच्या सुमारास रोषन याचा मृत्यू झाला रोषन र. ना. राऊत विद्यालयात

तलावांच्या नंतर विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे यांचा मोर्चा शहरातील गार्डन कडे" "गार्डन मधील निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल अधिकाऱ्यांना धरले धाऱ्यावर..."

Image
तलावांच्या नंतर विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे यांचा मोर्चा शहरातील गार्डन कडे" "गार्डन मधील निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल अधिकाऱ्यांना धरले धाऱ्यावर..." पनवेल  : पनवेल महानगरपालिकेच्या समोरच असलेले महात्मा गांधी उद्यानातील सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आज विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका सौ.सारिका भगत यांनी उद्यानाला भेट दिली. उद्यानात प्रथम गेल्यानंतर श्री.प्रितम म्हात्रे यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करताना पुतळ्या भोवती जमलेले जाळे त्यांच्या निदर्शनास आले असता त्यांना राग अनावर झाला त्यांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला त्यानंतर पुढे सदर उद्यानात टेंडर मधील कामानुसार आवश्यक असलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे हे त्यांनी अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले. येथे लावण्यात आलेले मार्बल व्यवस्थित फिटिंग झालेले नाहीत . उद्यानामध्ये सुरक्षारक्षक असतानासुद्धा सर्व परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला निदर्शनास आला याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आणि याचा अर्थ तेथील सुरक्षा रक्षकांच्या कामांवरत