Posts

Showing posts from November 9, 2021

जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतकऱ्यांची नैराश्यातून आत्महत्या

जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतकऱ्यांची नैराश्यातून आत्महत्या जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याच्या घटना आज मंगळवारी समोर आल्या आहेत . यात जळगाव तालुक्यातील बिलखेडा येथिल ६२ वर्षीय तर पाचोरा तालुक्यातील जामने ( सार्वे ) येथिल २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली आहे . जळगाव तालुक्यातील बिलखेडा येथे पहिल्या घटनेत माधवराव श्रावण कुंभार ( वय ६२ ) य वृध्द शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली . माधवराव कुंभार हे गावात कुंभार व्यवसाय करीत होते . तसेच त्यांची शेती असून त्यात देखील ते काम करीत असत . नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे . माधवराव यांच्या पश्चात पत्न , १ मुलगी व दोन मुले असा परिवार आहे . याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .   पाचोरा तालुक्यातील जामने ( सार्वे ) येथिल तरुण   शेतकरी   राहुल राजेंद्र पाटील ( वय २६ ) याने कपाशीचे अपेक्षित उत्पन्न न आल्याने नैराश्

दहशतवाद्याचं घर खरेदी केल्याचा 'तो' आरोप; नवाब मलिक म्हणाले...

Image
  दहशतवाद्याचं घर खरेदी केल्याचा ' तो ' आरोप ; नवाब मलिक म्हणाले ...   मुंबई :   मंत्री   नवाब मलिक   यांच्या कुटुंबीयांनी अंडरवर्ल्डंशी संबंधित व्यक्तींकडून   कुर्ला   एलबीएस रोड येथे ३ एकर जमीन कवडीमोल भावाने घेतल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते   देवेंद्र फडणवीस   यांनी केला आहे . त्याचवेळी मलिक यांच्या अन्य चार मालमत्तांचा उल्लेखही फडणवीस यांनी केला आहे . फडणवीस यांचे हे सारे आरोप फेटाळताना मलिक यांनी आपली बाजू माध्यमांपुढे ठेवली आहे . यात   वांद्रे   येथील एका प्लॅटची माहितीही मलिक यांनी दिली आहे .    कुर्ला एलबीएस रोड येथील जागेबाबत फडणवीस यांनी जी माहिती दिली आहे ती अर्धवट आणि अर्धसत्य आहे . जमिनीचा जो काही व्यवहार झाला आहे तो कायदेशीर प्रक्रियेनुसारच झालेला आहे . फडणवीस राईचा पर्वत करून सारं काही सांगत आहेत . त्याची खुशाल चौकशी करा . त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही , असे मलिक यांनी स्पष्ट केले . फडणवीस यांनी मलिक यांच्या इतर चार मालमत्तांचा उल्लेख केला आ