Posts

Showing posts from October 6, 2021

कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिरात १ हजार लेकींचे लसीकरण

Image
  कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिरात १ हजार लेकींचे लसीकरण पनवेल(प्रतिनिधी) सेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात पार पडलेल्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिरात १ हजार पनवेलच्या लेकींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होत या महाशिबीराला उदंड प्रतिसाद लाभला.  दोन दिवसीय या महाशिबिराचे उद्घाटन  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते व  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली  (दि. ०२)आयोजित करण्यात आले होते.   यावेळी या शिबिराच्या उत्तम नियोजनाबद्दल नामदार भारती पवार यांनी भरभरून कौतुक केले होते.     गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी एचपीव्ही नामक चाचणी करावी लागते आणि ही चाचणी महागडी असल्याने महिला याकडे दुर्लक्ष करतात.  जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या अ...

रयत शिक्षण संस्थेचा १०२ वा वर्धापन दिन साजरा

Image
  रयत शिक्षण संस्थेचा १०२ वा वर्धापन दिन साजरा  सातारा(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचा १०२ वा वर्धापन दिन सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्सटीट्युट ऑफ सायन्स या महाविद्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत,  संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोल्हापूर  विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.हेमंत कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती.   रयत शिक्षण संस्थेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की ,’’केवळ ३० रुपये व ४ विद्यार्थी घेऊन सुरु झालेल्या रयत शिक्षण संस्थेत आज साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.केजी पासून पीजी पर्यंत शिक्षण देत ग्रामीण भागात ज्ञानदान करणारी  ही संस्था केवळ शिक्षण देत नसून ती विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहे.विविध संस्थाशी सामंजस्य करार करून ती विद्यार्थ्याचे भवितव्य घडवीत आहे .ती विद्यार्थ्यांना रस्त्यावर सोडत नाह...

हरिश्चंद्र कार्लेकर यांना जिल्हास्तरीय आदर्श लेखनिक पुरस्कार

Image
 हरिश्चंद्र कार्लेकर यांना जिल्हास्तरीय आदर्श लेखनिक पुरस्कार २७ वर्षे लेखनिक  आणि  चित्रकार म्हणून काम करण्याचे चीज झाले.  अक्षय महागावकर / रायगड मत           रायगड जिल्हा परिषद अलिबाग माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यातर्फे कर्जत शेळके हॉल येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल नेवरूळ,ता.म्हसळा या शाळेचे लेखनिक श्री हरिश्चंद्र कार्लेकर यांना पालकमंत्री मा.अदितीताई तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी रायगड जिल्हा अध्यक्षा योगिता पारधी,आ.बाळाराम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुधाकर घारे, माजी विधानसभा सदस्य धैर्यशील पाटील, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, पंचायत समिती म्हसळा सभापती छाया म्हात्रे, संदिप चाचले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वच्छता दुत यांचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार

Image
  स्वच्छता दुत यांचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार पनवेल :  पनवेल महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत प्रभाग क्र १८ मधील स्वच्छता दुतांचा  सत्कार  विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे ,  नगरसेविका डॉ.   सुरेखा मोहोकर ,  प्रीती जॉर्ज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी स्वच्छता दुतांचे सन्मान करत कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल आभार व्यक्त केले.               आपला परिसर स्वछ व सुंदर ठेवण्यात  स्वच्छता दु तांचा मोठा वाटा असतो.  स्वच्छता दुत  हे नेहमी आपले शहर ,  गाव ,  परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. याच गोष्टीची जाणीव ठेवून पनवेल महापालिकेचे  विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे  यानी  स्वच्छता दुतांचा  सत्कार केला.  यावेळी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे ,  नगरसेवक गणेश कडू ,  नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर ,  नगरसेविका प्रीती जॉर्ज ,  नगरसेविका सारिका भगत ...