नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत पनवेल गुन्हे शाखेकडून घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या
नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत पनवेल गुन्हे शाखेकडून घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या नवी मुंबई / जितेंद्र नटे raigadmat@gmail.com नवी मुंबई आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष ०२ कडून घरफोडी करणाऱ्या इसमास अटक करण्यात आली. सराइत गुन्हेगार अब्दुल सईदबकरीदि खान, वय ३५ यास अटक करून कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सदर आरोपी हा रात्रीच्या वेळी दुकानाचे शटर उचकटून घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार आहे. आरोपी कडून १३,२२,४१९ रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. गेली अनेक दिवस तळोजा, खारघर, पनवेल नवी मुंबई येथे घरफोडी व दुकाने फोडण्याचा तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त श्री. बिपीनकुमार सिंह, नवी मुंबई मा. सह पोलीस आयुक्त श्री. डॉ. जय जाधव, मा. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. महेश घुर्ये मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, श्री. सुरेश मेंगडे, मा. सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, श्री. विनोद चव्हाण, यांनी आढावा घेऊन घरफोडीच्या गुन्ह्याच्या लक्ष केंद्रित करून ते उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेच्या सर्व शाखांना व सर्व पोलीस स्टेशनला सूचना दिल्या होत्या.