Posts

Showing posts from October 3, 2021

एनसीबीच्या कारवाईनंतर अशी झालीए आर्यन खानची अवस्था

Image
  मुंबईत एका क्रूजवर कारवाई करताना बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेतलं. त्यानंतर आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय जो क्रूझमध्ये झालेल्या तपासणीदरम्यानचा असल्याचं बोललं जातंय. मुंबई - बॉलिवूड अभिनेता   शाहरुख खान   याचा मुलगा   आर्यन खान   याला एनसीबीने ताब्यात घेतलं आहे . मुंबईहून गोव्याला जाण्याऱ्या एका आलिशान क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं आहे . त्यात आर्यनचाही समावेश आहे . क्रूझवर अंमली पदार्थांचं सेवन केलं जात असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली . परंतु , याप्रकरणी आर्यनचं नाव आल्याने सोशल मीडियावर वातावरण तापलं आहे . अशात आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतो आहे . आर्यनचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रचंड वायरल झाला आहे . व्हिडिओत आर्यन तोंडाला मास्क लावून गोंधळलेल्या अवस्थेत बसलेला दिसत आहे . त्यातही आर्यनच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता दोन्ही स्पष्ट दिसून येत आहेत . हा व्हिडीओ ए

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व - केंद्रीय मंत्री भारती पवार लेकींच्या आरोग्यासाठी उपक्रम राबविणार - आमदार प्रशांत ठाकूर

Image
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व - केंद्रीय मंत्री भारती पवार लेकींच्या आरोग्यासाठी उपक्रम राबविणार - आमदार प्रशांत ठाकूर पनवेल(हरेश साठे ) कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आणि जगासमोर मोठे संकट आले, अशा परिस्थितीत लोकसंख्येचा विचार करता आपल्या भारत देशावर त्याचा मोठा दुष्परिणाम झाला असता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योग्य निर्णय आणि उपाययोजनांमुळे कोरोनाच्या संकटकालातही देशाला सावरले आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज (शनिवार, दि. ०२ ऑक्टोबर) खांदा कॉलनी येथे केले. सेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिराचे उदघाट्न केंद्र