Posts

Showing posts from September 27, 2021

पनवेल : 2021 च्या दीपावली सणानिमित्त पालिका अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना सानुग्रह अनुदान मिळावे आणि सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर करावा अशी मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली आहे.

Image
  पनवेल :  2021  च्या दीपावली सणानिमित्त पालिका अधिकारी ,  कर्मचारी ,  कामगार यांना सानुग्रह अनुदान मिळावे आणि सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर करावा अशी मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली आहे.                 लोक   दिवाळी   दरवर्षी   सा जरी   करतात ,  भारताच्या सर्व   सण ांतील हा  सण   लोकांना आनंदाने , उत्साहाने भरपूर करतो.   दीपावलीचे चार दिवस हा आनंद दुथडी भरून वाहतो.   दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालिकेत काम करणारे सर्व कर्मचारी वर्गास दीपावली सण गोड व्हावा याकरता सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पुढील सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर करून घेण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे ,  प्रीती जॉर्ज ,  नगरसेविका डॉ डॉक्टर सुरेखा मोहोकर ,  सारिका भगत यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला विकासाची दिशा- केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव कामाच्या बाबतीत दोघेही आमदार वाघ आहेत- देवेंद्र फडणवीस

Image
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला विकासाची दिशा- केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव  कामाच्या बाबतीत दोघेही आमदार वाघ आहेत- देवेंद्र फडणवीस   पनवेल(प्रतिनिधी) काँग्रेसच्या काळात योजना बारगळायाच्या तर मोदी सरकारमुळे तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहोचल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला विकासाची दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, कामगार व वने मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी आज (दि. २५) येथे केले.   सेवा व समर्पण अभियान अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त रायगड जिल्हा भाजपच्या वतीने खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख मान्यवर म्हणून बोलत होते.  या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सेवा व समर्पण महाराष्ट्र राज्य प्रमुख माजी आमदार राज के. पुरोहित, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आमदार योगेश सागर, आमदार रवीशेठ पाटील, आमदार

पनवेल परिसरात खुलेआम मद्यपान, ढाब्यांवर होते मद्यविक्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष, ढाब्यांवर ‘खाणे कम दारू जाम’, कारवाईची मागणी

Image
  पनवेल परिसरात खुलेआम मद्यपान ,  ढाब्यांवर होते मद्यविक्री ,  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष,  ढाब्यांवर  ‘ खाणे कम दारू जाम ’, कारवाईची मागणी  पनवेल : ढाब्यांवर मद्यपान करण्यास मनाई असताना देखील पनवेल परिसरातील ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जात आहे. विशेष म्हणजे ढाबा चालकच मद्य पुरवठा करताना दिसत आहेत. तर काही ढाब्यांवर मद्य विक्री सुरु असल्याचे दिसून येत आहे.  त्यामुले अशा पकारे बेकायदेशिर धंदे करनारया विरोधात कारवाई करण्याची मागणी के ली जात आहे.               पनवेल परिसरातील ढाब्यांवर मद्यपान करुन मद्यपी खुलेआम धिंगाणा घालत आहेत. परिसरातील सुकापूर ,  नवीन पनवेल ,  शिरढोण ,  पळस्पे ,  आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढाबे आहेत. येथील ढाब्यांवर मद्यपान केले जात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्यपींची जत्रा भरते. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी गस्त घालावी व अशा हॉटेल व बारचालकांवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. परिसरातील ढाब्यांवर सर्रास दारूविक्री देखील सुरू असल्याचे समोर आले आहे. पनवेल पेण हायवे रोडवर असलेल्या ढाब्यांवर अवैधरित्या

२७ सप्टेंबर २०२१ पासुन टपालनाका ते उरण नाका हा मार्ग एक दिशा मार्ग

Image
  २७ सप्टेंबर २०२१ पासुन   टपालनाका ते उरण नाका हा मार्ग एक दिशा मार्ग  पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पनवेल शहर वाहतुक शाखेच्या हद्दीतील पनवेल शहर व आजुबाजुच्या परिसराचा विकास झपाटयाने झालेला आहे. पनवेल परिसराच्या लोकसंख्येत व मोटार वाहनांच्या संख्येत देखील मोठी वाढ झालेली आहे. परिणामी पनवेल शहरातील रस्त्यांवर वाढ झालेल्या मोटार वाहनांचा व रहदारीचा ताण पडलेला आहे. वाहतुकीच्या निर्माण झालेल्या समस्येमुळे पनवेल शहरातील मुख्य रस्ते व त्यांना जोडणारे इतर रस्ते येथे वरचेवर वाहतुकीचा खोळंबा होउन नागरीकांना, मोटार चालकांना अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी शहरातील वाहतुक व्यवस्थेत सुसुत्रता आणणेसाठी शहरातील वाहतुक व्यवस्थेमध्ये बदल करणे आवश्यक आहे.  त्यानुसार  टपाल नाका ते उरण नाका हा मार्ग एक दिशा मार्ग राहील. व उरण नाक्याकडुन टपाल नाक्याकडे येणा-या सर्व वाहनांना ( दुचाकी वाहने वगळुन ) प्रवेश बंद करण्याबाबतची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.   सध्याचा टपाल नाका ते उरण नाका एकेरी मार्ग करण्यात आल्याने इतर मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविण