शासकीय विविध दाखले शिबिरांचे आयोजन
शासकीय विविध दाखले शिबिरांचे आयोजन पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी व नागरिकांसाठी खारघर, सुकापूर, कळंबोली, आजिवली, कामोठे व गव्हाण या सहा ठिकाणी शासकीय विविध दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल, आधारकार्ड, वय व अधिवास, अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात, अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भुर्दंड पडत असतो, त्यामुळे नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसिलदार विजय तळकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात अशा प्रकारचे शिबीर आयोजित झाले नाहीत, त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय झाली होती पण आता ती दूर झाली आहे, त्यामुळे या शिबिराचा जास्तीत जास