म्हसळा तालुक्यातील आडी बौद्धजन व रोहिदास उन्नती मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; वृक्षारोपण करून जपली सामाजिक बांधिलकी !
म्हसळा तालुक्यातील आडी बौद्धजन व रोहिदास उन्नती मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; वृक्षारोपण करून जपली सामाजिक बांधिलकी ! म्हसळा :दिनेश काप संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा संदेश "वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे वनचरे" हा संदेश प्रत्यक्षात अंमलात आणला तो आडी बौध्दजन आणी रोहिदास उन्नती मंडळ यांच्या उत्साही कार्यकर्ते आणी स्थानिक मंडळानी.तसे पाहता आडी हे गांव श्रीवर्धन आणी म्हसळा यांच्या सीमेवर,डोंगरदऱ्यात आणी निसर्गाने मनसोक्त उधळण केलेले आणी सुप्रसिध्द सावित्री नदीच्या काठावर वसलेले म्हसळा तालुक्यातील आदर्श असे आडी गांव होय.या गावचे वैशिष्ट म्हणजे गावातील बौध्द समाज आणी रोहिदास समाज यांच्या प्रबोधन विचारसरणीतून गावांमध्ये बौध्द समाज आणी रोहिदास समाज यांचे सयुक्त मंडळ होय.या मंडळाच्या माध्यमातून गेल्या वर्षी म्हणजे ०३ जून २०२० रोजी जे निसर्ग नामक महाभयंकर चक्रीवादळ आले त्या मध्ये रायगड जिल्ह्याचे फार मोठी वीत्य हानी झाली,अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले,शेकडो झाडे मुळासकट उमलून जमीनदोस्त झाली.ही हानी कधीही भरून न येणारी आहे.परंतु आडी गावातील बंधूंनी हार मानली नाही अगदी मोठ्या जोमाने त