म्हसळा येथे १८६३ पासून सुरु असलेले ऐतिहासिक तहसील कार्यालय आता उभे राहणार नव्या जागेत • पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा महत्वपूर्ण निर्णय... • जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पारित केले आदेश. • रायगड मत आणि म्हसळा तालुक्यातील पत्रकारांनी लावून धरला होता नवीन इमारतीचा मुद्दा.
म्हसळा येथे १८६३ पासून सुरु असलेले ऐतिहासिक तहसील कार्यालय आता उभे राहणार नव्या जागेत • पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा महत्वपूर्ण निर्णय... • जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पारित केले आदेश. • रायगड मत आणि म्हसळा तालुक्यातील पत्रकारांनी लावून धरला होता नवीन इमारतीचा मुद्दा. म्हसळा : म्हसळा तहसील कार्यालयाचे कामकाज सध्याच्या वास्तूत वर्ष 1863 पासून सुरु आहे. कार्यालयाची इमारत अत्यंत जुनी झाली होती. त्याची डागडुजी करण्यासही प्रमाणापेक्षा जास्त खर्च येत होता. तहसील कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या पाहता ही जागा अपुरी पडत होती. या कार्यालयांतर्गत 84 महसूली गावे, 14 तलाठी तर दोन मंडळ अधिकारी कार्यालय कार्यरत आहेत. या सर्व अडचणींचा विचार करून यावर उपाय म्हणून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी म्हसळा तहसील कार्यालयाची नवी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने जागा देणेबाबतचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले होते. त्यानुसार म्हसळा तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी जागा प्रदान करण्यात आली आहे. पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार म्हसळा तहसील का