दिबांच्या नावासाठी स्वातंत्र्यदिनाच्या डेडलाईन; अन्यथा विमानतळाचे सर्व कामे बंद पाडणार
दिबांच्या नावासाठी स्वातंत्र्यदिनाच्या डेडलाईन; अन्यथा विमानतळाचे सर्व कामे बंद पाडणार 'फक्त दिबा दुसरे नाव दिले तर १९८४ च्या पेक्षा मोठा क्रांती लढा' पनवेल(प्रतिनिधी) १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनापर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, अन्यथा दुसऱ्या दिवसापासून विमानतळाची सर्व कामे बंद पाडण्यात येऊन क्रांती घडवली जाईल, असा इशारा लोकनेते दि. बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने आज (गुरुवार, दि. २४ जून) लाखो आंदोलकांच्या साक्षीने सिडको आणि राज्य सरकारला देण्यात आला. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, या मागणीसाठी बेलापूर येथे सिडकोवर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व जाती धर्माचे समाज, विविध राजकीय पक्ष, विविध संस्था, संघटना, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त नागरिक आंदोलनकर्त्यांनी सहभागी घेऊन 'जय दिबा' असा एल्गार केला. आणि 'फक्त दिबा दुसरे नाव दिले तर १९८४ च्या पेक्षा मोठा क्रांती लढा होईल, असा खणखणीत आवाजही दिला. यावेळी दिबासाहेबा