कर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने पैसे काढले आमदार प्रशांत ठाकूर यांचा गंभीर आरोप महाविकास आघाडी सरकारवरही सोडले टिकास्त्र
कर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने पैसे काढले आमदार प्रशांत ठाकूर यांचा गंभीर आरोप महाविकास आघाडी सरकारवरही सोडले टिकास्त्र पनवेल (प्रतिनिधी) : कर्नाळा बँक घोटाळा हा केवळ ६५ खात्यांपुरता मर्यादीत नसून त्याचे पालेमुळे खोलवर आहेत. या घोटाळ्यामध्ये शेकापचे इतर नेते सुध्दा भागिदार आहेत. आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने ओव्हर ट्राफने पैसे काढण्याचे आल्याच्या इंट्री आमच्या हाती लागल्या आहेत. असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. महाविकास आघाडीकडून माजी आमदार विवेक पाटील यांना पाठीशी घातले गेल्याचे सांगत राज्य सरकारकडून टिकास्त्र सोडले. मंगळवारी रात्री ईडीने कर्नाळा बँकेतून मनी लँड्रीग केल्याच्या आरोपावरुन माजी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी आज (दि. १६) पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महा विकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. आमदार महेश लांडगे यांच्यासह मला विधानसभेच्य