दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी २४ जूनला सिडकोला घेराव
दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी २४ जूनला सिडकोला घेराव किमान एक लाखाचा घेराव आंदोलनाची जय्यत तयारी पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी १० जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळीच्या आंदोलनानंतर आता २४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आणि त्या अनुषंगाने या आंदोलनात किमान ०१ लाख लोकांचा सहभाग असणार असून त्यावेळेस पुढील आंदोलनाचीही घोषणा करण्यात येणार आहे, असे आज (दि. १५) पनेवलमध्ये झालेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. आगरी समाज हॉल येथे झालेल्या रायगड व नवी मुंबई विभागाच्या बैठकीस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कॉ.भूषण पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा परिषेदचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, दीपक पाटील, रुपेश धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात