Posts

Showing posts from June 15, 2021

शेकापच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर सिडकोने उचलल्या झाडांच्या छाटलेल्या फांद्या

Image
 शेकापच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर सिडकोने उचलल्या झाडांच्या छाटलेल्या फांद्या पनवेल (वार्ताहर) ः गेल्या 10 दिवसापासून खांदा कॉलनी आणि परिसरात झाडांच्या छाटलेल्या फांद्या पडून आहेत. याचा मोठा त्रास खांदा कॉलोनी मधील रहिवासी, वाहनचालक यांना होत आहे. येत्या दोन दिवसात या फांद्या नाही उचलल्या तर शेकापचे कार्यकर्ते सिडको कार्यालयाच्या आवारात या फांद्या टाकून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता.  याची दखल घेत सिडकोने तात्काळ वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या झाडांच्या छाटलेल्या फांद्या उचलल्या आहेत. खांदा वसाहत परिसरात सिडकोकडून झाडांच्या फांद्या गेल्या 10 दिवसांपूर्वी छाटण्यात आल्या आहेत. परंतु फुथपाथ व रस्त्यावर पडलेल्या या फांद्या अद्याप उचलल्या गेल्या नाही आहेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना फुथपाथवरून त्रास होत आहे. तसेच रस्त्यावर पडलेल्या फांद्यांवर वाहनचालकांनासुद्धा वाहन चालविताना अडचण होत आहे. या संदर्भात सिडको कार्यालयात कळवूनही रस्त्यावर पडलेल्या या फांद्या अद्याप उचलल्या गेल्या नाही

शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेना लावणार 61 हजार झाडे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी सुरवात •

Image
 शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेना लावणार 61 हजार झाडे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी सुरवात  उद्धव ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसा पर्यंत उद्दिष्ठ करणार पूर्ण  पनवेल   (वार्ताहर)- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड याच्या वतीने पोलिस मुख्यालय रोडपाली येथे वृक्षारोपण करण्यात आले. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त 61 हजार झाडे लावण्याचा संकल्प महाराष्ट्र वाहतुक सेनेने सोडला आहे.  राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसी वृक्षरोपण करण्यास सुरूवात करण्यात आली असून  27 जुलैला माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा 61 वा वाढदिवस आहे. या दरम्यान  महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये 61 हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे या लागवडी बरोबर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी प्रत्येकावर सोपविण्यात आली आहे.    महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून निसर्गामध्ये भरपूर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या 61 हजार वृक्षांच्या रोपांची लागण करण्याचा निर्धार अध्यक्ष उदय दळवी यांच्या संकल्पनेतून करण्यात आला आहे. त्या अनुषंगान 13 जून पासू

पनवेल येथे गरजू रिक्षा-चालक व गरिब कामगार वर्ग यांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहरातर्फे आजचा दिवशी मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून ५० कुटूंबांना अन्य-धान्याचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमास मनसे पनवेल विधानसभा सचिव प्रतिक वैद्य, पनवेल उपशहर अध्यक्ष संदिप पाटील,प्रकाश लाड,रूपेश शेटे,मंदार पाटणकर वाहतूक सेना शहर अध्यक्ष सिद्धेश खानविलकर, ज्येष्ठ महाराष्ट्रसैनिक संजय मुरकुटे ,सचिन सिलकर,अनिमेश ओझे,दिपक शहा,अवधूत ठाकूर,गणेश गायकर,आकाश गाडे,अभि रिंगें,अक्षय जोशी,हिमांशु पाटील,आकाश घाटे,आकाश दलाल,विशाल चित्रुक आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Image
 पनवेल येथे गरजू  रिक्षा-चालक व गरिब कामगार वर्ग  यांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहरातर्फे आजचा दिवशी  मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून ५० कुटूंबांना अन्य-धान्याचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमास मनसे पनवेल विधानसभा सचिव प्रतिक वैद्य, पनवेल उपशहर अध्यक्ष संदिप पाटील,प्रकाश लाड,रूपेश शेटे,मंदार पाटणकर वाहतूक सेना शहर अध्यक्ष सिद्धेश खानविलकर, ज्येष्ठ महाराष्ट्रसैनिक  संजय मुरकुटे ,सचिन सिलकर,अनिमेश ओझे,दिपक शहा,अवधूत ठाकूर,गणेश गायकर,आकाश गाडे,अभि रिंगें,अक्षय जोशी,हिमांशु पाटील,आकाश घाटे,आकाश दलाल,विशाल चित्रुक आणि  इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

साडे चव्वेचाळीस लाख रुपये किंमतीच्या ट्रेलरची चोरी • 7 लाख रुपये किंमतीच्या मालाचा अपहार

Image
 साडे चव्वेचाळीस लाख रुपये किंमतीच्या ट्रेलरची चोरी पनवेल, दि.14 (संजय कदम) ः  साडे चव्वेचाळीस लाख रुपये किंमतीच्या ट्रेलरची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना तळोजा परिसरात घडली आहे. ओमप्रकाश यादव (37) यांच्या ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रेलर क्र.एमएच-46-एच-2539 हा माल भरुन एल अ‍ॅन्टी टी कंपनीसमोरील मुंब्रा-पनवेल जाणार्‍या रोडवर तळोजा येथे उभा करून ठेवला असता अज्ञात चोरट्याने सदर ट्रेलर लबाडीच्या इराद्याने मालासह चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 7 लाख रुपये किंमतीच्या मालाचा अपहार पनवेल, दि.14 (संजय कदम) ः 7 लाख रुपये किंमतीच्या मालाचा अपहार झाल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहतीमधील जी.राईडस् फन फॅक्टरीजमध्ये घडली आहे. गौरव अग्रवाल यांनी त्यांच्या जी.राईटस् फन फॅक्टरीजमध्ये जॉईंन्ट व्हिल राईटस्, ब्रेक डान्स राईटस्, ट्रान्सफार्मर, एसी, मायक्रोओव्हव असा मिळून 7,10,000/- रुपये किंमतीचा माल ठेवला असता सदर कंपनीचे सुपर वायझर भरत मोटवानी यांनी सदर मालाचा अपहार केल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार तळोजा पोलीस सदर आरोपीचा शोध घेत आहेत.

घरफोडीत रोख रकमेसह दागिने लंपास

Image
 घरफोडीत रोख रकमेसह दागिने लंपास पनवेल, दि.14 (संजय कदम) ः एका बंद घरात अज्ञात चोरट्याने बाल्कनीच्या दरवाजाद्वारे आत प्रवेश करून बेडरुममधील लोखंडी कपाटाच्या दरवाजाचे लॉक तोडून आतील रोख रकमेसह दागिने असा मिळून जवळपास 1 लाख 40 हजाराचा ऐवज चोरुन नेल्याची घटना तालुक्यातील इंडिया बुल्स ग्रीन सेक्टर 3 कोनगाव येथे घडली आहे. या ठिकाणी राहणारे सजनलाल पृथ्वीराज मिना (33) यांचे बंद असल्याचे पाहून अज्ञात इसमाने त्यांच्या बंद घराच्या बाल्कनीच्या दरवाजाच्यावाटे घरामध्ये प्रवेश करून घरातील बेडरुममध्ये असलेल्या लोेखंडी कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम 50 हजार असा मिळून जवळपास 1 लाख 40 हजाराचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

वृद्ध भाजी विक्रेत्या महिलेची रोख रक्कम केली लंपास

Image
वृद्ध भाजी विक्रेत्या महिलेची रोख रक्कम केली लंपास पनवेल, दि.14 (संजय कदम) ः भाजीच्या गोणीखाली पर्समध्ये ठेवलेले रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना पनवेल शहरातील गुणे हॉस्पिटल जवळील भाजी मार्केट येथे घडली आहे. श्रीमती.सरस्वती राऊत (72) या गुणे हॉस्पिटलजवळ भाजी विक्रेत्याचा व्यवसाय करतात. त्यांनी त्यांच्या जवळ साठलेली 22 हजाराची रोख रक्कम भाजीच्या गोणीखाली पर्समध्ये ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर रोख रक्कम चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पाठपुराव्याने म.औ.वि.मंडळाचे प्रादेशिक कार्यालय पनवेलमध्ये

Image
  तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पाठपुराव्याने म.औ.वि.मंडळाचे प्रादेशिक कार्यालय पनवेलमध्ये पनवेल (वार्ताहर) ः तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन आणि अध्यक्ष सतीश (अण्णा) शेट्टी यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय पनवेल येथे सुरू होत आहे. तसे आदेश नुकतेच म.औ.वि.मंडळाने काढले असून आजपासून सर्व कारभार पनवेल येथील खांदा कॉलनी येथे असलेल्या कार्यालयातून सुरू होणार असल्याचे तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने प्रसिद्ध केले आहे. मागील बर्‍याच वर्षापासून तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने तळोजा एमआयडीसी परिसरात असणार्‍या कंपन्यांसाठीचे प्रादेशिक कार्यालय पनवेल येथे सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला होता. तळोजा एमआयडीसीमध्ये असणार्‍या कंपन्यांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी 25 कि.मी.वर दूर असणार्‍या महापे येथील कार्यालयामध्ये फेर्‍या माराव्या लागत होत्या. त्यासाठी बराच वेळ आणि ऊर्जा वाया जात होती. तळोजा एमआयडीसीमध्ये लहान-मोठ्या एकूण 1622 कंपन्या असून त्यांना प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी ठाणे जिल्ह्यातील महापे येथील प्रादेशिक कार्यालयामध्ये जावे लागत होते. महापे

मराठा क्रांती मोर्चाची 18 जूनला पनवेल येथे बैठक

 मराठा क्रांती मोर्चाची 18 जूनला पनवेल येथे बैठक पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः  मराठा क्रांती मोर्चाची मुक आंदोलनाच्या नियोजनाच्या संदर्भात पनवेल येथील व्ही.के.हायस्कूल या ठिकाणी येत्या 18 जून रोजी सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र मूक आंदोलन छत्रपती संभाजी राजेंनी 16 जून पासून कोल्हापूर येथून आंदोलनाला सुरुवात करत आहेत. त्यानंतर नाशिक, संभाजीनगर, अमरावती आणि रायगडची 28 जून तारीख दिली आहे. असे पहिल्या टप्प्यात आंदोलने होणार आहे. रायगडची तयारी करण्यासाठी 18 जूनला जिल्ह्याची बैठक घ्यायची आहे तरी सर्व तालुक्यातील 4/5 समन्वयक मिटिंग ला येणे आवश्यक असल्याचे विनोद सदाशिव साबळे, सुनील पाटील, गणेश कडू, राजेश लाड, शंकर पवार, प्रदीप देशमुख, हरीश बेकावडे, रुपेश कदम, अविनाश पाटील, संतोष पवार, शरद गोळे, अनिल भोसले, शशिकांत मोरे, नरेश सावंत, चेतन सुर्वे, कमलाकर लबडे, संजोग मानकर, संतोष साप्ते, वाय सी जाधव यांनी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करण्यात आला स्वच्छ

Image
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करण्यात आला स्वच्छ  पनवेल : पनवेलमधील प्रभाग क्र.१९ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मधमाश्यांचे पोळे लागले होते. याची माहिती काही सामाजिक संस्था आणि सुजाण नागरिकांनी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या कडे केली. यावेळी प्रितम म्हात्रे यांनी तात्काळ सदर विषयाबाबत महापालिकेच्या अधिकारी वर्गाला कळविले. व लगेच तेथे अग्निशमन दलाच्या माध्यमातून योग्य कार्यवाही करण्यात आली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे युवानेते अविनाश मकास व युवानेते अवधुत पाठारी उपस्थित होते. आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मधमाश्यांचे पोळे लागले असल्याची माहिती काही सामाजिक संस्था आणि समाजसेवकानी दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या माध्यमातून योग्य कार्यवाही करण्यात आली. पनवेल मधील सर्व पुतळ्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष पथक नेमण्यात यावे व त्यांना ड्रेस कोड देण्यात यावे.  -प्रितम म्हात्रे, विरोधी पक्षने, पनवेल महापालिका 

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्यांना आधार - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Image
  लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्यांना आधार  - केंद्रीय मंत्री रामदास आठवले पनवेल(प्रतिनिधी) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबरोबर मी संसदेत काम केले. ते स्वच्छ अंत:करणाचे व सरळ मनाचे दानशूर नेते आहेत. मी त्यांना दीर्घ आयुरारोग्य चिंतितो, असे सांगून केेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीत सामान्य माणूस आणि पत्रकार यांचीही त्यांनी दखल घेतली ही बाब महत्त्वाची आहे. कोरोना देवदूत पुरस्काराचे मानकरी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांसाठी दिलेल्या अन्नधान्याच्या किटचे वाटप करताना ते बोलत होते. मुंबई मराठी पत्रकार संघात या किटचे वितरण करताना राज्यमंत्री आठवले यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला.   समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे होते. कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र शासनाने पत्रकारांना वार्‍यावर सोडले असल्याची खंत वाबळे यांनी या वेळी व्यक्त केली. राज्यमंत्री आठवले यांनी पंतप्रधानांकडे पत्रकारांची बाजू मांडावी, असे आवाहन त्यांनी केल