Posts

Showing posts from June 13, 2021

*नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व.दि बा.पाटील यांचेच नाव दिले जावे,न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील -बाळासाहेब पाटील - कोकण म्हाडा मा.सभापती*

Image
 *नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व.दि बा.पाटील यांचेच नाव दिले जावे,न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील -बाळासाहेब पाटील - कोकण म्हाडा मा.सभापती* नव्याने होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक प्रकल्प ग्रस्त,नागरिक हे अत्यंत आक्रमक असून आपल्या भावना आणि मागणी सरकार दरबारी मांडण्यासाठी कृती संघर्ष समितीच्या वतीने विशाल असे ‘मानवी साखळी आंदोलन’ करण्यात आले. स्थानिक भूमिपुत्र नागरिक,हजारो भाजपा कार्यकर्ते, सर्वपक्षीय कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते व त्यांनी आपल्या भावना तीव्रपणे मांडल्या. या आंदोलनात कोकण म्हाडा मा.सभापती बाळासाहेब पाटील व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा मा.उपमहापौर विक्रांत पाटील हे शेकडो कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा.बाळासाहेब पाटील म्हणाले की,  स्व.दि.बा.पाटील हे निःश्ययाचा महामेरू होते. शेतकऱ्यांच्या कल्याणाचा एखादा विषय ठरवला तर तो मार्गी लावायचाच हा त्यांचा संघर्षशील स्वभाव होता.अनेक कार्यक्रम आणि आंदोलने यात स्व.दि.बा.पाटील साहेबांचा मला सहवास ल

पनवेलमध्ये ही निलेश लंके प्रतिष्ठानची जीवनावश्यक मदत प्रतिष्ठानचा तरुण तुर्कांनी घेतला सामाजिक पुढाकार गोर गरिबांना कोरडा शिधा किट वाटप आ.निलेश लंके यांच्या कडून प्रेरणा घेऊन राबवला उपक्रम

Image
 पनवेलमध्ये ही निलेश लंके प्रतिष्ठानची जीवनावश्यक मदत प्रतिष्ठानचा तरुण तुर्कांनी घेतला सामाजिक पुढाकार गोर गरिबांना कोरडा शिधा किट वाटप  आ.निलेश लंके यांच्या कडून प्रेरणा घेऊन राबवला उपक्रम पनवेल /प्रतिनिधी:- पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांचा कोरोना काळातील कामाचा डंका सातासमुद्रापार पोहोचला आहे. आमदार असावा तर लंके यांचा सारखा अशा प्रकारची सामूहिक प्रतिक्रिया सध्या महाराष्ट्रात उमटत आहे. केवळ त्याच भागात नाही तर पनवेल परिसरातही निलेश लंके प्रतिष्ठान चे सातत्याने सामाजिक पाऊल पडत आहे. प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी कामोठे आणि कळंबोली परिसरात कोरडा शिधा असलेली कीट देऊन गोर गरीब गरजूंना खऱ्या अर्थाने जीवनावश्यक मदत करण्यात आली . संघटनेच्या तरूण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून  कोरोना वैश्विक संकटाचे संपूर्ण जगावर सावट आहे. त्याला भारत आणि महाराष्ट्र राज्य अपवाद नाही. अनेकांना या आजाराची बाधा झाली. काहींना त्यामध्ये जीव सुद्धा गमवावा लागला. या अडचणीच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी कसा असावा याचा प्रत्यय  पारनेरचे आमदार निलेश लं

झाडांच्या छाटलेल्या फांद्या वेळीच न उचलल्यास सिडको कार्यालयाच्या आवारात या फांद्या टाकून शेकाप तीव्र आंदोलन छेडणार

Image
 झाडांच्या छाटलेल्या फांद्या वेळीच न उचलल्यास सिडको कार्यालयाच्या आवारात या फांद्या टाकून शेकाप तीव्र आंदोलन छेडणार पनवेल, दि.13 (वार्ताहर)-गेल्या १० दिवसापासून खांदा कॉलनी आणि परिसरात झाडांच्या छाटलेल्या फांद्या पडून आहेत.याचा मोठा त्रास खांदा कॉलोनी मधील रहिवासी, वाहनचालक यांना होत आहे. येत्या दोन दिवसात या फांद्या नाही उचलल्या तर शेकापचे कार्यकर्ते सिडको कार्यालयाच्या आवारात या फांद्या टाकून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.           या निवेदनाला यांनी म्हटले आहे की, खांदा वसाहत परिसरात सिडकोकडून झाडांच्या फांद्या गेल्या 10 दिवसांपूर्वी छाटण्यात आल्या आहेत. परंतु फुथपाथ व रस्त्यावर पडलेल्या या फांद्या अद्याप उचलल्या गेल्या नाही आहेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना फुथपाथवरून त्रास होत आहे. तसेच रस्त्यावर पडलेल्या फांद्यांवर वाहनचालकांनासुद्धा वाहन चालविताना अडचण होत आहे. या संदर्भात सिडको कार्यालयात कळवूनहीरस्त्यावर पडलेल्या या फांद्या अद्याप उचलल्या गेल्या नाही आहेत.येत्या दोन

डॉ . भुषणकुमार उपाध्याय , अप्पर पोलीस महासंचालक यांच्या “ मृत्युंजय दुत " या संकल्पनेमुळे महामार्ग पोलीस केंद्र , पळस्पेच्या हद्दीतील महामार्गावर वाचले २२ जणांचे प्राण

Image
 डॉ . भुषणकुमार उपाध्याय , अप्पर पोलीस महासंचालक यांच्या “ मृत्युंजय दुत " या संकल्पनेमुळे महामार्ग पोलीस केंद्र , पळस्पेच्या हद्दीतील महामार्गावर वाचले २२ जणांचे प्राण  पनवेल, दि.13 (संजय कदम)-महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक डॉ . भुषणकुमार उपाध्याय यांनी महामार्गावरील अपघात कसे रोखता येतील तसेच अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना लवकरात लवकर कशी मदत मिळेल या धर्तीवर ०१ मार्च २०२१ पासुन मृत्युंजय दुत ही संकल्पना संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. महामार्ग पोलीस केंद्र , पळस्पे नवी मुंबई यांचे वतीने महाराष्ट्रातील महत्वाच्या मुबई - पुणे महामार्गावर मार्च २०२१ पासुन मृत्युंजय दुत ही संकल्पना राबविण्यात येत असून आत्ता पर्यंत या दूतांनी 22 जणांचे प्राण वाचविले आहेत.           महामार्ग पोलीस केंद्र , पळस्पे च्या हद्दीमध्ये एकुण ३६ मृत्युंजय दुत कार्यरत आहेत . या संकल्पनेमध्ये महामार्गाच्या लगतच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते , स्थानिक सरकारी संस्था व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी , ढाबे , पेट्रोल पंपाचे कर्मचारी व केन चे कर्मचार

कुणबी युवा संघर्ष समिती वसई-विरार तफे निराधार महिलांना धान्य वाटप

Image
कुणबी युवा संघर्ष समिती वसई-विरार तफे निराधार महिलांना धान्य वाटप    समाजातील बांधव....      सस्नेह जय कुणबी (किसान) आजचा दिवस आमच्या तुमच्या साठी अतिशय सुवर्ण दिवस.या दिवशी आपले दैवत छत्रपती शिवाजीराजे मराठी माणसांचे स्वप्नातील राज्य व्हावे जनता सुखी व्हावी यासाठी जे स्वराज्य निर्मिती झाली .त्या स्वराज्याचे सर्व जनतेचे राजे झाले,तो शिवस्वराज्यभिषेकाचा आजचा सुवर्ण दिनी ६/६/२०२१ रोजी      # कुणबी युवा संघर्ष समिती वसई- विरार  मा.दिपक भरणकर  आणि सचिन जोशी यांच्या पुढाकाराने अजून पर्यत 103  लोंकाना धान्य किट वाटप      व अनाथांचे नाथ म्हणून धावून आले ते गुहागर तालुक्याचे माजी आमदार" विनयजी नातू साहेब" यांच्या संयुक्त सहयोगाने  अनाथ निराधार महिलांना जिवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.       यावेळी प्रस्तावना मा.दिपक भरणकर सर यांनी केली . छत्रपती शिवाजी महाराज , जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतीबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.      103 अनाथ विधवा महिलांसाठी किराणा किट वाटप करण्यात आले.      यावेळी मनवेल