अल्पवयीन मुलांना दुचाकी व मोबाईल चोरी प्रकरणी गुन्हे मध्यवर्ती शाखेने केले गजाआड
अल्पवयीन मुलांना दुचाकी व मोबाईल चोरी प्रकरणी गुन्हे मध्यवर्ती शाखेने केले गजाआड पनवेल, दि.12 (संजय कदम) ः दुचाकी व मोबाईल चोरीच्या गुन्हयांमध्ये अलिकडच्या काळात अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असल्याच्या घटना पोलिस तपासातून समोर येत असल्याने समाजासाठी ही निश्चिच धोक्याची बाब आहे. ताज्या घटनेत, नवी मुंबई गुन्हेशाखा मध्यवर्ती कक्षाच्या पोलिसांनी दोघा अल्पयीन गुन्हेगारांना जेरबंद करून नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत या दुकलीने केलेले सात दुचाकी व सहा मोबाईल चोरीचे असे एकूण 13 गुन्हे उघडकीस आणत एकूण चार लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी व मोबाईल चोरीसह इतर गुन्हयांच्या घटनांत वाढ झाल्याची बाब लक्षात घेवून पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह, अपर पोलीस आयुक्त डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त प्रविणकुमार पाटील व सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती