Posts

Showing posts from June 10, 2021
Image
 दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुलगी बेपत्ता ?? पोलीसांचा शोधकार्य चालूच...... सर्फराज दर्जी  (बोर्ली पंचतन): श्रीवर्धन तालुक्यात दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडवली गावातील , आफरीन हुसैन शिरगावकर, वय-२२ ही हरवलेची घटना समोर आली आहे. या बद्दल दिघी सागरी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहतीनुसार, हनिफा हुसैन शिरगावकर(आई) व  लहान मुलगी नसरीन शिरगावकर हे दोन्हीही  मोठी मुलगी अमरीन हिला भेटण्यासाठी  ३० मे २०२१ रोजी सकाळी चिपळूण येथे गेल्या असता, आफरिन हुसैन शिरगावकर वय-२२, उंची १५५सेमी.,चेहरा-उभट,शरिराने सडपातळ,रंगाने निमगोरा,हि अंगावर पंजाबी ड्रेस घालून दिनांक ३० मे २०२१ रोजी सकाळी ९वाजता च्या सुमारास ३० मे २०२१ रोजी आपल्या राहत्या वडवली येथील घरातून कोणाला न सांगता कुठे तरी निघून गेली. हनीफा ही चिपळूण येथून सायंकाळी परत  आल्यावर आपली मुलगी आफरीन  उशिरापर्यंत घरी नाही परतल्याने  तिचा नातेवाईक आणि मित्रांकडे शोध घेण्यात आला. मात्र, शोध घेऊन देखील आफरीन सापडली नाही. त्यामुळे तिची आई हनीफा हुसैन शिरगावकर हिने  आपली मुलगी बेपत्ता असल्याचे कळताच  दिघी पोलिस ठाण्यात दि.१जून२०२१ रोजी म
Image
  आंदोलनाची पहिली जोरदार पायरी यशस्वी  दिबासाहेबांसाठी उभी राहिली मानवतेची साखळी  दिबांच्या नावासाठी संघर्षाची जोरदार तयारी  २४ जून सिडको घेरावाचीही जय्यत तयारी  पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे आणि त्यासाठी सरकारचे लक्ष केंद्रित झाले पाहिजे याकरिता रायगड ते मुंबई अशी भव्य मानवी साखळी आंदोलन आज (दि. १० जून ) करण्यात आले. 'हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते, वाया जाऊ द्यायचे नसते' आणि 'संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही' हे प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे वचन घेऊन हे आंदोलन झाले. दिबांच्या नावासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल, त्यासाठी आम्ही तयार आहोत अशीच भूमिका या आंदोलनात पहायला मिळाली. पनवेल मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते सीबीडी बेलापूर अशी तब्बल १२ किमी अंतराची मानवी साखळी बघताना हि दिबांसाठी मानवतेची साखळी असल्याचे अधोरेखित झाले.  रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात एकूण जवळपास २०० किमी अंतराची मानवी साखळी उभारण्यात आली होती. यामध्ये जवळपास ४० हजारहुन जास्त जणांनी सहभाग

पनवेल महापालिकेने लागू केलेला अवाजवी मालमत्ता करामध्ये नियमीतता व पारदर्शकता यावी ः महानगरप्रमुख रामदास शेवाळे

Image
 पनवेल महापालिकेने लागू केलेला अवाजवी मालमत्ता करामध्ये नियमीतता व पारदर्शकता यावी ः महानगरप्रमुख रामदास शेवाळे raigadmat.page पनवेल / संजय कदम  : सध्या करोना संकटकाळ सूरु असताना संसर्गजन्य स्थिती असताना लोकांचे आधिच आर्थिक व मानसिक नूकसान झालेले आहे. पनवेल महापालिकेने लावलेल्या मालमत्ता कराचा भार हा लोकांना सहन होण्यासारखा नाही. मानवतेच्या दृष्टीने व सरकारची जबाबदारी समजून करात फार मोठी कपात करुन सामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी शिवसेना पनवेल महानगर क्षेत्र महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महानगरपालिकेकडे केली आहे.          पनवेल शहर महानगर पालिका क्षेत्रातील गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना आपल्या कार्यालयाकडून अवाजवी मालमत्ता कर लावण्यात आलेला आहे . सदहू कर हा सन आक्टोबर 2016 पासून आज रोजी पर्यंत लावण्यात आलेला आहे. सिडको महामंडळाने सुद्धा सेवा शुल्क व पाणी पट्टी तथा सिडको हस्तांतरण शुल्क आज रोजीपर्यंत घेत आहेत . एकाच क्षेत्रात सेवेकरीता दोन सरकारी प्राधिकरण कर संकलीत करत असल्या कारणाने सामान्य नागरिकांची लुट होत असल्याचे प्रथम दर्शनी सिद्ध होत आहे . तरी आपण सदर मालमत्ता करा