७ तारखेपासून तुमचा जिल्हा होणार का अनलॉक? सविस्तर वाचा ....
महाराष्ट्र अनलॉक मुंबई : राज्यातील स्तरनिहाय अनलॉक बाबतचा आदेश अखेर जारी करण्यात आला असून ५ टप्प्यांमध्ये जिल्हे अनलॉक होणार आहेत . करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत . त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत . यामुळे तुमचा जिल्हा अनलॉक होणार का हे आताच पाहून घ्या . ५ टक्के पॉझिटिव्हिटी दर व २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे . तर या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच सोमवारपासून होईल , असे नमूद करण्यात आले आहे . असे आहेत पाच स्तर : पहिला स्तर : करोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील असे जिल्हे . पहिल्या स्तरातील जिल्हे - अहमदनगर , भंडारा , बुलढाणा , चंद्रपूर , धुळे , गोंदिया , जळगाव , जालना , लातूर , नागपूर , नांदेड , ठाणे , वर्धा दुसरा स्तर : पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५