Posts

Showing posts from June 3, 2021

वेद नाही वाचले तरी चालेल पण वेदना मात्र वाचता यायला हवी ! बाललैंगिक अत्याचार व पोक्सो कायदा .

 वेद नाही वाचले तरी चालेल पण वेदना मात्र वाचता यायला हवी ! बाललैंगिक अत्याचार व पोक्सो कायदा .           4 जून हा दिवस International day of  Innocent  children victims of aggression म्हणजे आक्रमकतेला बळी पडलेल्या निष्पाप बालकांचा दिवस म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे  , या दिवसाचे औचित्य साधून  बालकांवर होणाऱ्या शोषणावर प्रकाश टाकून व अन्यायाला वाचा  फोडून जनजागृती घडवून आणण्याचा हा छोटासा प्रयत्न  इतिहास :-             1982 मध्ये झालेल्या जागतिक युद्धा मध्ये इस्रायलकडून मोठ्या प्रमाणावर लेबणान व पॅलेस्टाईन मधील बालकांवर अत्याचार करण्यात आले. या हिंसाचारामध्ये  असंख्य  निष्पाप लहान मुलांना  वेदना  झाल्या त्यांचे शोषण झाले . हे सर्व  आज इतिहासजमा झालेले असताना या मुलांना आपण  न्याय तर देऊ शकत  नाही पण आपल्या आजूबाजूला होणाऱ्या बालकांवरील अत्याचारा विरोधात  जनजागृती व सावधानता तर नक्कीच  निर्माण करू शकतो.  बाललैंगिक शोषण म्हणजे काय (child sexual abuse ):-                    बाललैंगिक शोषण हा मुद्दा अतिसंवेदनशील आहे , तो अतिगंभीर गुन्हा आहे प्रत्येक पालकांनी आपल्या बालकांप्रति जागरूक  असणे महत्