पनवेल महानगरपालिका हद्दीतील परदेशामध्ये शिक्षणाकरीता जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लसीकरणाची सोय करा -डॉ. अरुणकुमार शंकर भगत, नगरसेवक
पनवेल महानगरपालिका हद्दीतील परदेशामध्ये शिक्षणाकरीता जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लसीकरणाची सोय करा - डॉ. अरुणकुमार शंकर भगत , नगरसेवक पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील परदेशामध्ये शिक्षणाकरीता जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लसीकरणाची सोय करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार शंकर भगत यानी पालिका आयुक्ताकड़े केली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील अनेक विद्यार्थी परदेशामध्ये उच्च शिक्षण घेत असुन , कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांचे शिक्षण वाया जाऊ नये याकरीता जवळील नवी मुंबई महानगरपालिकेकडून परदेशी शिक्षण घेण्याकरीता जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता विशेष लसीकरण मोहिम आयोजीत केलेली असुन , आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत अनेकांकडून मागणी होत आहे. तरी पनवेल महानगरपालिका हद्दीतील १८ ते ४४ वयोगटातील ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता परदेशी जावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांना महानगरपालिकेकडून विशेष मोहिम राबवुन लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी , अशी मागणी नगरसेवक डॉ. अरुणकुमार शंकर भगत