
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत काय होणार, येत्या काळात राज्यात कडक लॉकडाऊन? राज्यात सक्तीचा लॉकडाऊन लावायचा, की 'ब्रेक दि चेन' या मोहिमेअंतर्गत निर्बंध आणखी कडक करायचे यासंबंधी चर्चा करत वाढता कोरोना संसर्ग आटोक्याच आणण्यासाठीच्या मार्गांबाबच चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुपारी राज्य मंत्रीमंडळाची एक बैठक पार पडणार आहे. मुंबई : राज्यात सक्तीचा लॉकडाऊन लावायचा, की 'ब्रेक दि चेन' या मोहिमेअंतर्गत निर्बंध आणखी कडक करायचे यासंबंधी चर्चा करत वाढता कोरोना संसर्ग आटोक्याच आणण्यासाठीच्या मार्गांबाबच चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुपारी राज्य मंत्रीमंडळाची एक बैठक पार पडणार आहे. राज्यभरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्यामुळं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबतची नाराजी व्यत्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय इतरही अनेक मंत्र्यांनी लॉकडाऊन चाच सूर आळवला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षांतील मंत्र्यांनी कडक लॉ़कडाऊनचाच सूर आळवत सध्या निर्बंधांचं पालन होण्यात हयगय दिसून ...