Posts

Showing posts from April 19, 2021

म्हसळा तालुका महसूल विभागांत मंडळ अधिकारी पदे रिक्त,ज्युनिअर तळाठीकडे मंडळ अधिकारी चार्ज.नागरीकांमध्ये नाराजी.

  म्हसळा तालुका महसूल विभागांत मंडळ अधिकारी पदे रिक्त,ज्युनिअर तळाठीकडे मंडळ अधिकारी चार्ज.नागरीकांमध्ये नाराजी. श्रीवर्धन  : (मंगेश निंबरे) म्हसळा तालुक्यांतील महसूल विभागांत सावळा गोंधळ सुरु असून त्याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे गावखेडयातून कामाकरीता गोरगरीब जनतेची कामे रखडली आहेत त्यामुळे प्रांतअधिकारी तहसिलदार यांच्या बाबत नाराजी व्यक्त होत आहे          म्हसळा महसुल विभागांत मंडळअधिकारी चार पदे रिक्त असून त्या जागी प्रभारी अधिकारी म्हणून साहेबांचा मर्जीतील ज्युनिअर तळाठी कडे मंडळअधिकारी चार्ज देण्यात आला आहे येथे वरीष्ठ अधिकारी असताना त्यांना डावळून मात्र ज्युनिअर तळाठी यांना चार्च देऊन नागरीकांकडे कामांबाबत वारस नोंद इतर कामे यासंदर्भातील अपुर्ण माहीती मुळे  गोरगरीब जनतेतेची कामे रखडत ठेवली जात आहेत त्याच प्रमाणे साहेबांच्या मर्जीतील तळाठयांकडे असलेले मंडळअधिकारी चार्ज असल्याने गोरगरीब जनतेला उध्द्धटपणाने वागणूक मिळत आहे यामुळे नागरीकांमधून नाराजी व्यक्त हेत असून  ज्युनिअर तळाठयां कडून मंडळअधिकारी चार्ज काढ़ण्यात यावा अन्यथा तालुक्यांतील नागरीक अंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्य

गरीब, आदिवासी महिलांना सरकारी दवाखान्यात प्रसूतीची परवानगी देण्यात यावी - प्रितम म्हात्रे, विरोधी पक्षनेते

Image
  गरीब ,  आदिवासी महिलां ना   सरकारी दवाखान्यात प्रसूतीची परवानगी देण्यात यावी   -   प्रितम म्हात्रे ,   विरोधी पक्षनेते नवीन पनवेल :  कोविडच्या धर्तीवर पनवेल उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर महिलांच्या प्रसूतीचे काम बंद आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील ,  आदिवासी भागातील गरीब महिलांची गैरसोय होत आहे. प्रसूतीसाठी खाजगी दवाखान्यात जाण्याची वेळ त्यांच्यावर आली असून भरमसाठ पैशाची गरज भासत आहे. त्यामुळे गरीब ,  आदिवासी महिलांची होणारी होरपळ थांबवण्यासाठी सरकारी दवाखान्यात प्रसूतीची परवानगी देण्यात यावी  अशी मागणी  विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे   यानी  आरोग्य मंत्री राजेश टोपे ,  पालकमंत्री आदिती तटकरे ,  पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख   यांच्याकडे केली आहे.               संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढवले आहे.  या कोरोनात कित्येकांचा मृत्यु झालेला आहे.  तर कित्येक जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनाच्या या संकटामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढवलेले आहे. या कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे.   कोरोनाच्या महामारीमध्ये खेड्यापाड्यातील आणि आदिवासी भागातील गोरगरी