Posts

Showing posts from April 16, 2021

• महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आदई, पनवेल यांच्यावतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन • आयोजक कुमार सुजित सोनावणे मनसे वाहतूक सेना तालुका चिटणीस तसेच श्री विलास तानाजी भेरे यांनी यांनी या सर्व रक्तदात्यांचे आभार मानले

Image
 • महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आदई, पनवेल यांच्यावतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान  शिबिराचे आयोजन • आयोजक कुमार सुजित सोनावणे मनसे वाहतूक सेना तालुका चिटणीस तसेच श्री विलास तानाजी भेरे यांनी यांनी या सर्व रक्तदात्यांचे आभार मानले आदई/पनवेल@रायगड मत       महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आदई, पनवेल यांच्यावतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान  शिबिराचे आयोजन केले गेले होते. या शिबिरासाठी आदई गाव तसेच नवीन पनवेल या परिसरातून खूप लोकांचा प्रतिसाद लाभला.       सुमारे 38 लोकांनी या शिबिरामध्ये येऊन रक्तदान केले. कोविड सारख्या महामारी आणि त्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून या सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करून आपलं समाजाप्रती असलेलं कर्तव्य निभावले, त्यासाठी आयोजक कुमार सुजित सोनावणे मनसे वाहतूक सेना तालुका चिटणीस तसेच श्री विलास तानाजी भेरे यांनी यांनी या सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.      हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मनसे सैनिक राकेश वाघमारे , सूरज चावरे,विवेक शिरसाठ राज पाटील, विकास सिंग यांनी सिंहाचा व

शेतकरी कामगार पक्ष आणि तेरणा मेडिकल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

  शेतकरी कामगार पक्ष आणि तेरणा मेडिकल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर संपन्न पनवेल : 15 एप्रिल रोजी किड्स गार्डन स्कूल, सुकापूर येथे रक्तदान शिबिर पार पडलं .या शिबिरामध्ये अतिशय साधानगिरीने सर्व शासकीय नियम लक्षात घेऊन गर्दी होऊन न देता देखील तब्बल 65 जणांनी रक्तदान केले. शिबिराचं उदघाटन  शेतकरी कामगार पक्षाचे  कार्यकर्ते गणेश भाऊ केणी आणि भगवान बुधाजी म्हसकर यांच्या शुभ हस्ते झाले. प्रत्येक रक्तदात्याला रक्तदानासाठी वेळ ठरवून दिलेली होती त्यामुळे उगाचच गर्दी होण्याचा प्रश्न उद्भवला नाही          देशभर कोरोना स्थिती आणि रक्ताचा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे शेकाप तालुका चिटणीस राजेश गणेश केणी यांनी सांगितले  सामाजिक परिस्थिती लक्षात घेता प्रत्येकाने देशसेवेला हातभार लावणं गरजेचं आहे आपण केलेलं रक्तदान एखाद्याचा जीव वाचवू शकतं, किंबहुना आपल्यापैकी कोणालाही रक्ताची गरज लागू शकते .त्यामुळे शेकाप च्या वतीने तालुक्यात इतर ठिकाणी देखील रक्तदान शिबिर आयोजित करणार असल्याचे राजेश केणी यांनी सांगितले. शेकाप चे पालीदेवद ग्रामपंचायत सदस्य यांचा लग्