Posts

Showing posts from April 3, 2021

पनवेल तालुक्यातील कोळखे गावचे दिलीप जाधव यांची कन्या दिपाली जाधव यांची महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरिक्षकपदी निवड झाल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ गझलकार ऐ.के.शेख, जेष्ठ पत्रकार गणेश कोळी व दिलीप जाधव उपस्थित होते.

Image

मालमत्ता कर अभय योजना जाहीर झाल्याने नागरिकांनी मानले परेश ठाकूर यांचे आभार

Image
  मालमत्ता कर अभय योजना जाहीर झाल्याने नागरिकांनी मानले परेश ठाकूर यांचे आभार पनवेल(प्रतिनिधी) सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मागणी केल्याप्रमाणे पनवेल शहरातील पूर्वाश्रमित नगर परिषद हद्दीतील मालमत्ताधारकांसाठी महापालिकेने मालमत्ता कर अभय योजना जाहीर केली आहे. पनवेल शहरातील ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचे बिल देण्यात आले आहे त्यांच्यासाठी ही मालमत्ता कर अभय योजना आहे. ही योजना जाहीर झाल्याने अनेक नागरिकांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानले आहेत. पनवेल महापालिकेने मालमत्ता कराची वसुली करण्यास सुरुवात केल्याने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी 24 मार्च 2021 रोजी आयुक्तांना पत्र लिहून कोरोनामुळे अनेक नागरिकांचे व्यवसाय बंद पडले आहेत, तर काहींच्या नोकर्‍या गेल्या आहेत. त्यातच पुन्हा कोरोना वाढीस लागल्याने नागरिकांना मालमत्ता कर वेळेत भरणे शक्य होत नसल्याने त्यांच्या आर्थिक अडचणीचा विचार करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी कर भरण्याची मुदत वाढवून 30 एप्रिल 2021 करावी आणि शास्ती अभय योजना सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला आयुक्तांनी मंजुरी दिल्याने ज्यांनी अजूनही मालमत्ता कर भरला नाही