Posts

Showing posts from March 31, 2021

पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे याना दुसर्यादा कोरोनाची लागण

Image
पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे याना दुसर्यादा कोरोनाची लागण पनवेल : पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे याना दुसर्यादा कोरोनाची लागण झाली आहे.  दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे आपण सर्वांनी मास्क वापरावा ,   सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी   असे आवाहन प्रितम म्हात्रे यानी केले आहे.          गेल्या काही दिवसापासून पनवेल आणि अजूबाजूच्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे.   पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी  अँटीजेन टेस्ट केली असता  त्यांची  दुसऱ्यांदा कोरोना चाचणी  पोजिटिव्ह   आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी  व  मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे आपण सर्वांनी मास्क वापरावा ,   सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी   असे आवाहन प्रितम म्हात्रे यानी केले आहे.  

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठानतर्फे गरजुंना करण्यात येणार ७०० पुराणपोळ्यांचे वाटप

Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त  राजे प्रतिष्ठानतर्फे गरजुंना करण्यात येणार ७०० पुराणपोळ्यांचे वाटप पनवेल(प्रतिनिधी)  होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे यावर्षीही पनवेल शहरामधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल या ठिकाणी असलेल्या गोर - गरिबांना व गरजूंना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ७०० पुरणपोळीचे वाटप करण्यात येणार आहे.     होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या पोटाची भूक शमविण्यासाठी व्हावा तसेच प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी अशी संकल्पना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांना सुचली. त्यानुसार गेल्या ३ वर्षांपासून होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते. होळी सणाच्या दिवशी अनेकांच्या घरी गोडधोड असते तसेच होळीत प्रसाद म्हणून अनेक ठिकाणी पुरणपोळी टाकण्याचे कार्यक्रम देखील होत असतात. मात्र या माध्यमातून अन्नाचा नास होते. तर दुसरीकडे अनेक गोर गरिबांना सण