करवाढी विरोधात विरोधी पक्षाची पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निदर्शने, सत्ताधार्यांची दुटप्पी भूमिका
करवाढी विरोधात विरोधी पक्षाची पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निदर्शने , सत्ताधार्यांची दुटप्पी भूमिका पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांवर लादलेल्या जाचक कराविरोधात 22 मार्च रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निदर्शने केली व जोपर्यंत पालिका मालमत्ता कराबाबत विशेष सभा आयोजित करत नाही तो पर्यंत पालिकेच्या कुठल्याही सभेत विरोधी पक्षाचे सदस्य हजेरी लावणार नाही अशी भूमीका देखील यावेळी घेतली. जर पुढच्या 10 दिवसांमध् ये विशेष सभा आयोजित करण्यात आली नाही तर महाविकास आघाडीतर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल. अशी भूमिका घेतल्यानंतर महापौरानी येत्या आठ दिवसात सभा लावणार असल्याचे सांगितले. मालमत्ता करवा ढ संदर्भात 17 जानेवारी 2019 रोजी 46- 25 या बहुमताने मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मंजूर कर ण्यात आ ला . याला महाविकास आघाडीच्या 25 नगरसेवकांनी विरोध केला होता . महानगरपालिका हद्दीत पाच वर्षे कोणताही नवीन दर लागू नये अशी भूमिका महाविकास आघाडीने त्यावेळी घेतली होती . आणि आजही घेतलेली आहे . कर वाढीला नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात विरोध