Posts

Showing posts from February 19, 2021

रक्तदान आरोग्य शिबिराचे आयोजन

Image
  रक्तदान आरोग्य शिबिराचे आयोजन पनवेल : जे. एम. म्हात्रे चारीटेबल संस्था ,  पनवेल आणि निर्माण डायग्नोस्टिक सेंटर यांच्यातर्फे  19  फेब्रुवारी रोजी शेकाप जनसंपर्क कार्यालय ,  सेक्टर  10,  खांदा कॉलनी येथे रक्तदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.             19  फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. शेकाप जनसंपर्क कार्यालय खांदा कॉलनी येथे सकाळी दहा ते चार या वेळेत रक्तदान शिबिर घेतले जाणार आहे. या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते डॉक्टर प्रीतम म्हात्रे ,  नवी मुंबईचे युवा नेते वैभव नाईक ,  नगरसेवक गणेश कडू ,  सौरभ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे.    

महापालिकेतर्फे 9 आरोग्य केंद्राना मंजूरी, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश

Image
  महापालिकेतर्फे 9 आरोग्य केंद्राना मंजूरी ,  विरोधी पक्षनेते प्रि तम म्हात्रे यां च्या   मागणी ला यश पनवेल :  पनवेल महानगरपालिकेची महासभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहात 18 फेब्रुवारी रोजी पार पडली. या सभेत महापालिकेतर्फे 9 आरोग्य केंद्राना मंजूरी   देण्यात आली आहे. पालिका हददित आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी यापूर्वी केली होती. त्यांच्या या मागनीला यश आले आहे.          पनवेल महानगरपालिका हददित  यापूर्वी फक्त सहा आरोग्य केंद्र कार्यरत होते. त्यापैकी दोन आरोग्य केंद्र पनवेल शहरात ,  नवीन पनवेल ,  कळंबोली ,  खारघर ,  कामोठे अशी सहा आरोग्य केंद्र आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र नव्याने सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे ,  नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहोकर ,  प्रीती जॉर्ज ,  सारीका भगत हे  2018  पासून लेखी पाठपुरावा करत आहेत. या विषयाबाबत प्र शासनाने वेळोवेळी माहिती दिली होती. 18  फेब्रुवारी   रोजी महासभेत नऊ ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रितम

सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या संकल्पना व पाठपुराव्यातून पनवेलमध्ये शिवसृष्टी खासदार श्रीरंग बारणे व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले लोकार्पण सुंदर शिवसृष्टी उभारल्याबद्दल सभागृहनेते परेश ठाकूर यांचे कौतुक आणि आभारही

Image
  सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या संकल्पना व पाठपुराव्यातून पनवेलमध्ये शिवसृष्टी  खासदार श्रीरंग बारणे व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले लोकार्पण  सुंदर शिवसृष्टी उभारल्याबद्दल सभागृहनेते परेश ठाकूर यांचे कौतुक आणि आभारही  पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून,  मागणीतून आणि सातत्यपुर्ण पाठपुराव्यातून  पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला (दि. १८) खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले.  सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी केलेल्या संकल्पना व पाठपुराव्या बद्दल त्यांचे यावेळी मान्यवरांसह पनवेलकरांनी कौतुक करण्यात आले.      या सोहळ्यास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर अध्यक्ष जयंत पगडे, स्था