Posts

Showing posts from February 6, 2021

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ७० सामाजिक उपक्रमांची सुरुवात

Image
  राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ७० सामाजिक उपक्रमांची सुरुवात सभागृहनेते परेश ठाकूर यांची विशेष उपस्थिती. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या उपक्रमांचे कौतुक. पनवेल(प्रतिनिधी) श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा येत्या २ जून २०२१ रोजी वाढदिवस असून त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस व पत्रकार मित्र असोशिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी ७० व्या वाढदिवसानिमित्त ७० सामाजिक उपक्रम करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार या उपक्रमांची सुरुवात दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ रोजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीत पनवेलमधील युनियन हॉटेल येथे गरीब - गरजू लहान मुलांना मिसळ  महोत्सवातून करण्यात आली. यावेळी परेश ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, केवल महाडिक यांनी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्याप्रती असलेले प्रे

हळदी कुंकू समारंभ उत्साहात.

Image
  पनवेल मधील देवद गावातील पाटील कुटुंबियांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महिलांना वाण देण्यासोबत महिला, लहानगे आणि ज्येष्ठ महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उत्तम नियोजनामध्ये झालेला हा समारंभ यशस्वी करण्यासाठी युवकांनी विशेष मेहनत घेतली. 

हळदीकुंकू समारंभाचे आयोजन

Image
  पनवेल : पनवेल येथील वैश्यवाणी- एक हात मदतीचा या संस्थेतर्फे वैश्य समाज हॉल ,  मिरची गल्ली पनवेल येथे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार  7  फेब्रुवारी  2021  रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.        या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष प्रदीप (बापू) दलाल आणि उपाध्यक्ष हर्षदा तांबोळी यांनी केले आहे. या हळदीकुंकू समारंभचे खास आकर्षण म्हणजे स्टार प्रवाह मालिकेतील फुलाला सुगंध मातीचा मधील अभिनेत्री ऐश्वर्या शेटे उपस्थित राहणार आहेत.  

पनवेलमध्ये जोरदार "टाळा ठोको व हल्लाबोल सर्वसामान्यांचे वीज बिल माफ करण्याची मागणी.

Image
  पनवेलमध्ये जोरदार "टाळा ठोको व हल्लाबोल``   सर्वसामान्यांचे वीज बिल माफ करण्याची मागणी  पनवेल(प्रतिनिधी) राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविण्याचे काम करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत भिंगारी येथील महावितरण कार्यालयात आज (दि. ०५) "टाळा ठोको व हल्लाबोल" आंदोलन करण्यात आले.    दरमहा १०० युनिट बिल माफ करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते त्यानुसार १२ महिन्यांचे १२०० युनिटचे वीज बिल माफ करा तसेच शेतकऱ्यांचे किमान पाच वर्षे वीज कनेक्शन कापू नये, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.         या आंदोलनात भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक मनोज भुजबळ, संतोष भोईर, नगरसेविका दर्श

आंदोलन म्हसळा तालुका महावितरण विरोधात टाळा टोको व हल्लबोल

Image
आंदोलन   म्हसळा तालुका महावितरण विरोधात टाळा टोको व हल्लबोल         महावितरण कंपनी ने जनतेची पिळवणूक करायला सुरुवात केली असून महावितरण विरोधात टाळा टोको व हल्लबोल आंदोलन म्हसळा भाजपा तालुका अध्यक्ष श्री प्रकाश रायकर यांच्या नेतृत्वाखाली आज संपन्न झाले.        यावेळी श्री.प्रकाश रायकर म्हणाले की महावितरणाने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटिस पाठवली आहे. काही ठिकाणी  कनेक्शन तोडायला देखील सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील ४ कोटी जनेतला अंधारात टाकण्याचे पाप करणार्‍या महावितरणाच्या निषेधार्ह शुक्रवार दि ५ फेब्रुवारी रोजी भाजपाने राज्यभर मंडल स्तरावरील महाविरतण केंद्रावर टाळा टोको व हल्लबोल आंदोलन आयोजित केले आहे. कोरोना काळातील वीज बिल माफ करण्यात यावीत यासाठी अनेक मागण्या देखील करण्यात आल्या परंतु महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफ न करता उलट महावितरण कंपनी कडून नोटिस पाठवून कनेक्शन कट करून जनतेची पिळवणूक करायला सुरुवात केलेली आहे. सामान्य लोकांचे रोजगार बुडाले ते वीज बिल कसे भरणार ?  त्यांची पिळवणूक करणे कितपत योग्य आहे ?  असा सवाल भाजपा तालुका अध्यक्ष श्री प्रकाश रायकर यांनी क