Posts

Showing posts from February 5, 2021

रायगड जिल्ह्यात अवैध धंदे तेजीत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

Image
  रायगड जिल्ह्यात अवैध धंदे तेजीत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन रायगड जिल्ह्यात मटका,जुगार व अवैध धंदे सध्या तेजीत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी या धंद्यावर त्वरित कारवाई करावी,अशी आग्रही मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अड.काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी रायगड जिल्हाधिकऱ्यांना नुकतेच दिले आहे.  रायगड जिल्हा मधील जवळपास सर्वच पोलीस ठाण्याचा हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे,जुगार,मटका व गावठी दारू (घुगा) गुटखा विक्री होत आहे. रायगड पोलीस चुकीच्या कामांना खतपाणी घालत आहेत. हे सकृतदर्शनी दिसून येत आहे. परिणामी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण झाला आहे. हे माहिती असून सुद्धा रायगड पोलीस फ्कत बघायची भूमिका घेत आहेत. रायगड जिल्ह्यातील नागरिक पोलिसांच्या भ्रष्ट प्रवृत्तीला खूप त्रस्त झाले आहेत. पोलीस दलातील हप्तेखोर,कामचुकार,बेशिस्त, व बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांची, हाप्तेखोर पोलिसांच्या संप्तीची उघड चौकशी होणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्याधिशांमर्फत उच्चस्तरीय चौकशी करून कडक का

श्रीवर्धन मध्ये नेटवर्क नसल्यामुळे तालुका संपर्क क्षेत्राबाहेर, जनतेचे होत आहेत हाल, लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष्य देतील का? मोबाईल कंपन्या विरोधात माजी जि. प. सदस्य अविनाश कोलंबेकर यांचे प्रांतांना निवेदन.

Image
 रायगड जिल्हा, श्रीवर्धन प्रतिनिधी : संदीप लाड श्रीवर्धन मध्ये नेटवर्क नसल्यामुळे तालुका संपर्क क्षेत्राबाहेर, जनतेचे होत आहेत  हाल, लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष्य देतील का? मोबाईल कंपन्या विरोधात माजी जि. प. सदस्य अविनाश कोलंबेकर यांचे प्रांतांना निवेदन  श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात  सर्वच कंपन्याची मोबाईल नेटवर्क यंत्रणा वारंवार खंडीत होत असल्यामुळे नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या मनात आक्रोश आणि संताप निर्माण झाला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती, सर्व बँका, एम.एस.ई.बी. (विद्युत) कार्यालय, पोलीस स्टेशन व एकंदरीत सर्वच शासकीय कार्यालयांत मोबाइल नेटवर्कचा वारंवार फज्जा उडाल्यामुळे लोकांच्या कामामध्ये दिरंगाई होत असून तसेच शासनाच्या ऑनलाईन शिक्षणप्रणालीमुळे विद्यार्थ्यांना नेट नसल्याने अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. नागरिकाना शासकीय कामानिमित्त जवळपास 30 ते 35 की.मी. चा प्रवास आणि पैसे खर्च करुन श्रीवर्धन येथे जावे लागते, परंतू कार्यालया मध्ये पोहोचल्या नंतर तेथील कर्मचाऱ्यांकडून नेहमी नेट नाही हे ठेवणीतले उत्तर मिळते, त्यामूळे 

रक्तदान शिबिराचे आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन .

Image
  रक्तदान शिबिराचे आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन    पनवेल : रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत 4 फेब्रुवारी 2021 वाहतूक शाखा कळंबोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री  कुमारी आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,  पनवेल विभागीय पोलीस उपायुक्त शिवराज पाटील,पुरुषोत्तम कऱ्हाड, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, कळंबोली वाहतूक पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार, अभिजीत मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस प्रशांत पाटील, नगरसेवक सतीश पाटील, नगरसेवक रवींद्र भगत, माजी नगराध्यक्ष सुनील मोहोड, नगरसेवक प्रमोद भगत, माजी नगरसेवक शिवदास कांबळे तसेच पोलीस कर्मचारी व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते..          नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत रक्त संकलन केले गेले. तसेच जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी केली गेली. त्यामध्ये निर्माण डायग्नोस्टिक सेंटर यांच्या नियोज

आज महावितरणाविरोधात ``टाळा ठोको व हल्लाबोल`` आंदोलन.

Image
  आज महावितरणाविरोधात ``टाळा ठोको व हल्लाबोल`` आंदोलन पनवेल(प्रतिनिधी) राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने चालविणे आहे.  याचा निषेध करण्यासाठी आणि वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पनवेल तालुका व शहर भाजपच्यावतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. ०५ फेब्रुवारी) सकाळी १०. ३० वाजता भिंगारी येथील महावितरण कार्यालय येथे "टाळा ठोको व हल्लाबोल`` आंदोलन करण्यात येणार आहे.            महावितरणाने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणाच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२१ रोजी राज्यभर मंडलस्तरावरील महावितरण केंद्रांवर ``टाळा ठोको व हल्लाबोल`` आंदोलन होणार आहे, या आंदोलनात कार्यकर्ते व वीज ग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केले आहे. 

जगदीप भिवंडकर यांची खांदा कॉलनी शिवसेना शाखेस सदिच्छा भेट.

Image
  जगदीप भिवंडकर यांची खांदा कॉलनी शिवसेना शाखेस सदिच्छा भेट पनवेल:-  केंद्रीय जीएसटी आयकर विभागाचे असिस्टंट कमिशनर  जगदिप एस. भिवंडकर यांनी नुकतीच खांदा कॉलनी शिवसेना शाखा प्रमुख मंगेश पवार त्यांच्या विनंतीला मान देत  शाखेला भेट दिली. त्यावेळी शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखेतर्फे उपशहर प्रमुख  संपत सुवर्णा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी तिथे खांदा कॉलनीतील शिवसेना पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी त्यांनी सर्वांशी संवाद साधून भविष्यात काही कामे असतील तर मदत करण्याची तयारी दर्शविली तसेच पुढील महिन्यात रक्तदान शिबीर आणि मेडिकल चेक अप कॅम्प ठेवण्यासाठी सहकार्य करतील असेही त्यांनी सांगितले.           जगदिप एस. भिवंडकर साहेब हे सध्या सेंट्रल जीएसटी आयकर विभाग अहमदाबाद येथे असिस्टंट कमिशनर म्हणून कार्यरत आहेत, वयाची 37वर्षे ते या विभागात काम करत असताना ते मुंबई, नवी मुंबई येथेही कार्यरत होते. या कारकिर्दीत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी अनेक शिखरे गाठली आहेत, श्री.भिवंडकर  हे पेशाने असिस्टंट कमिशनर असले तरी त्या

स्पर्धेत रिया चौधरीचा द्वितीय क्रमांक.

Image
  स्पर्धेत रिया चौधरीचा द्वितीय क्रमांक नवीन पनवेल : रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअर आयोजित रोटरी एकपात्री अभिनय स्पर्धा रायगड जिल्ह्यातील मुलांसाठी आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत रिया राजेंद्र चौधरी हिने आपली कला सादर केली आणि तिला द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले.   या अभिनययुक्त   एकपात्री   सादर   करण् यात आले. यावेली अध्यक्ष डॉ. किरण नाबर ,  सचिव निमिष परब ,  खाजीनदार डॉ. राजेंद्र चांदोरकर उपस्थित होते.

भाजपच्यावतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन.

Image
  भाजपच्यावतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन  पनवेल(प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने ' द्विस्तरीय शिवगान स्पर्धा २०२१' चे आयोजन करण्यात आले आहे.      महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली हि स्पर्धा होणार असून हि स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तिगीत, आरती, ओवी, ललकारी,अभंग, आदी प्रकारच्या गीतांची असणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. प्राथमिक फेरी मंगळवार दिनांक ०९ फेब्रुवारीला पनवेल येथे होणार असून अंतिम फेरी १९ फेब्रुवारीला सातारा येथील अजिंक्यतारा गड येथे होणार आहे. हि स्पर्धा खुली असून यात महाराष्ट्रातील कोणत्याही  नागरिकास सहभाग घेता येणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हास्तरावर व अंतिम फेरी राज्यस्तरावर होणार आहे.   स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अधिक माहितीकरिता पनवेल- गणेश जगताप- ९८७०११६९६४, संजीव कुलकर्णी - ९९८७०१५६८३, कामोठे-  भागराज चौधरी ७९७७७८७६७०, सुशील शर्मा ९९२०७०७६१०, पनवेल ग्रामीण- मंगेश वाकडीकर ९८७०२२९५४५, उरण- मनोहर जामकर  ९७५७१