Posts

Showing posts from February 3, 2021

पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे " सकाळ सन्मान पुरस्काराने सन्मानित.

Image
  पनवेल महानगर पालि केचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे  " सकाळ सन्मान पुरस्काराने सन्मानित पनवेल   : रवींद्र नाट्य मंदिर ,   प्रभादेवी येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी   "सकाळ सन्मान पुरस्कार"    देऊन पनवेल महानगर पालि केचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे   याना  गौरविले.  जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या   वतीने   लॉकडाऊन काळात आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतः प्रितम म्हात्रे यांनी असंख्य गरजूंना मदत केली. या कार्याची दखल घेऊन जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा यथोचित गौरव संस्थेचे अध्यक्ष तसेच पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते   प्रीतम म्हात्रे   यांना सुपूर्द करून सन्मान केला.            सन २०२० हे वर्ष कोरोना विषाणू साथीचा आजार ,  लॉकडाऊन ,  मास्क व सॅनिटाझरसोबत जगण्याच्या लढ़ाईत निघून गेले. कोरोना मुले अनेक जणांचे आयुष्य विस्कळीत झाले. कोरोना विषाणूच्या प्रसाराने मानवतेचे दर्शन घडवले. अनेक ठिकाणी नाग...

राज्यस्तरीय सातव्या 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेत "नातं " जिंकले .

Image
  राज्यस्तरीय सातव्या 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेत "नातं " जिंकले  पनवेल (प्रतिनिधी) राज्यस्तरीय सातव्या 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या व्हाइट लाइटची एकांकिका " नातं " ने बाजी मारत एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पटकाविला.          अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने   आयोजित हि एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. या  समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर  होते  प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध ना...

देवदूत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 'सकाळ सन्मान २०२१' ने सन्मान.

Image
  देवदूत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 'सकाळ सन्मान २०२१' ने सन्मान  पनवेल (हरेश साठे) राजकारण न करता माणुसकीचे नाते, सर्वधर्म समभाव, सामाजिक बांधिलकी जपणारे देवदूत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोरोना काळात समाजाप्रती दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल 'दै. सकाळ' च्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त 'सकाळ सन्मान २०२१' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.           कोरोना वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करत देवदूताप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रामाणिक कार्य केले. कोरोनाच्या आव्हानात्मक काळात कोरोनावर मात करण्यासाठी मोलाची भूमिका बजाविणारे सेवाव्रती देवदूत लो कनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेले कार्य संस्मरणीय आणि अग्र स्थानावर आहे.  राजकारण पेक्षा समाजकारणाला महत्व देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गरजूंच्या मदतीसाठी कधीही राजकारण केले नाही, सदैव आपल्याकडून कशी मदत होईल याचाच त्यांनी विचार केला. त्यामुळे लोकांवर आलेले कोणतेही संकट असो ते आपले आहे असे मानून लोकनेते रामशेठ ठाकूर ...

पनवेल महानगरपालिकेतील बेजबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करा; अन्यथा तीव्र आंदोलन.

Image
  पनवेल महानगरपालिकेतील बेजबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करा  - सत्ताधाऱ्यांची मागणी आणि तीव्र आंदोलनाचा ईशाराही  पनवेल(प्रतिनिधी) कर्तव्यात कसूर करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांविरोधात सत्ताधाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत त्यांचे निलंबन करण्याची जोरदार मागणी आज (दि. ०२) आयुक्तांकडे केली आहे.  तसेच संबधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर उद्यापर्यत प्रशा सनाने कारवाई केली नाही तर भाजप-आरपीआयच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.  पनवेल महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तसेच इतर अधिकारी सातत्याने बेजबाबदारपणे वागत मनमानी कारभार करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने या अधिकाऱ्यांविरोधात नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. स्वछता असो किंवा पाहणी वा बैठक काही अधिकारी कामचुकारपणा करत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे आज सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून अधिकाऱयांच्या कामचुकारपणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्य...

श्री राम मंदिर उभारणी करीता ज्येष्ठ डॉक्टर गोविंद गुणे यांच्याकडून ०१ लाख १११ ची मदत .

Image
  श्री राम मंदिर उभारणी करीता ज्येष्ठ डॉक्टर गोविंद गुणे यांच्याकडून ०१ लाख १११ ची मदत  पनवेल (प्रतिनिधी) श्री राम मंदिर उभारणी करीता पनवेलचे ज्येष्ठ डॉक्टर गोविंद गुणे यांनी ०१ लाख १११ रुपयांचा मदत निधी दिला आहे. सदरचा धनादेश डॉ.गुणे यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला असून यावेळी प्रतिथयश डॉ. गिरिष गुणे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी उपस्थित होते. डॉ.गुणे यांचे रुग्णालय हे वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी रूपाने काम करत आहे. वैद्यकीय तज्ञ म्हणून ते फक्त पनवेल पुरते प्रसिद्ध नसून त्यांची रायगड, नवी मुंबई व राज्यभर ख्याती आहे. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या उभारणीत आपलाही योगदान असावा, या दृष्टीने डॉ.गुणे यांनी निधी दिला आहे. Attachments area