Posts

Showing posts from January 30, 2021

तीस वर्षीय महिला बेपत्ता.

Image
  तीस वर्षीय महिला बेपत्ता   नवीन पनवेल:   समता नगर ,  बारवई येथून कोणालाही काहीही न सांगता तीस वर्षीय महिला घरातून निघून गेली आहे.   त्यामुळे ती    हरवली असल्याची तक्रार तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मीना फुलचंद आवटे या महिलेचा रंग सावळा ,  केस लांब वाढलेले ,  अंगाने मजबूत आहे. तिने अंगात काळ्या रंगाची साडी ,  गळ्यात काळ्या रंगाचे मंगळसूत्र घातलेले आहे. तिची उंची चार फूट ,  सहा इंच आहे. या महिलेबाबत अधिक माहिती असल्यास त्यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. एन सांगळे यांच्याशी संपर्क साधावा.   29  वर्षीय महिला बेपत्ता   नवीन पनवेल : तालुक्यातील सोमटणे येथील  29  वर्षीय करुणा गणेश भोपी ही महिला राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेली आहे. त्यामुळे ती हरवली असल्याची तक्रार तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.               करुणा  चे वय  29  वर्षे असून ती अंगाने सडपातळ आहे. तिचा चेहरा उभट ,  डोळे काळे ,  केस लांब असून तिने अंगात पिवळ्या रंगाचा ड्रेस आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातलेला आहे. तिने पायात लाल रंगाची चप्पल ,  गळ्यात काळा मण्यांचे मंगळसूत्र आणि नाकात चमकी घातलेली

पनवेल बसस्थानकातील शौचालयाची दुरुस्ती तातडीने करावी प्रभाग समिती ड सभापती सुशिला घरत यांची मागणी.

Image
  पनवेल बसस्थानकातील शौचालयाची दुरुस्ती तातडीने करावी प्रभाग समिती ड सभापती सुशिला घरत यांची मागणी. पनवेल(प्रतिनिधी) पनवेल बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या बसस्थानकावरुन घाटमाथ्यावर तसेच कोकणात जाण्यासाठी सोयीचे बसस्थानक आहे. या बसस्थानकावरुन रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या बसस्थानकाचे काम थांबलेले आहे. तसेच या ठिकाणच्या शौचालयाची दुरावस्था झाल्याने विशेषता महिला प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे पनवेल बसस्थानकातील शौचालयाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी प्रभाग समिती ड सभापती सुशिला घरत यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. या शौचालयाची अतिशय दयनिय अवस्था झाली असून स्लॅब गळत आहे आणि तो कधीही कोसळू शकतो. तसेच या शौचालयातून अत्यंत दुर्गंधी पसरत आहे. सध्याची कोवीडची परिस्थिती पाहता या शौचालयामुळे आणखी रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच या शौचालयाचे आउटलेट हे वसाहतीतील नाल्यामधून काढण्यात आले आहे. त्यामुळे येथे राहणार्‍या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे आउटलेट दुसरीकडे वळविण्यात यावे अशी मागणीही या निव

राज्यस्तरीय 'अटल करंडक' स्पर्धेचा रविवारी पारितोषिक वितरण सोहळा.

Image
  राज्यस्तरीय 'अटल करंडक' स्पर्धेचा रविवारी पारितोषिक वितरण सोहळा , लोकनेते रामशेठ ठाकूर समारंभाध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून  सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष  प्रेमानंद   गज्वी यांची उपस्थिती  नाट्य सिने क्षेत्रातील अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती  पनवेल(प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये होत असलेल्या   राज्यस्तरीय सातव्या ' अटल करंडक' एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ०५ वाजता होणार आहे.        पनवेल शहरातील  आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणाऱ्या या  समारंभाच्या अध्यक् षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून  सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष  प्रेमानंद   गज्वी  हे उपस्थित राहणार आहेत. या