Posts

Showing posts from January 29, 2021

पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांना लाच घेताना अटक.

Image
  पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांना लाच घेताना अटक,                               अलिबाग : पनवेल पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे हे ॲ न्टी करप्शनच्या जाळ्यात अडकलेआहेत. सेवापट व एलपीसीसाठी लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अचानक झालेल्या या कारवाईने रायगड जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी वर्गामध्ये खळबळ उडालीआहे.         आज (शुक्रवार, २९ जानेवारी) दुपारी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. प्रभारी गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सेवापट आणि एलपीसीसाठी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार आल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली आणि आज सापळा रचण्यात आला. जिल्हा परिषदेच्या एका दालनात ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारताना प्रभारी गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. 

सिने नाट्य कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत 'राज्यस्तरीय अटल करंडक' स्पर्धेला प्रारंभ .

Image
  सिने नाट्य कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत 'राज्यस्तरीय अटल करंडक' स्पर्धेला प्रारंभ  ' अटल करंडक' एकांकिका स्पर्धेला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  पनवेल(प्रतिनिधी) पनवेलमध्ये होत असलेल्या सातव्या  राज्यस्तरीय ' अटल करंडक' एकांकिका स्पर्धेचा प्रारंभ आज (दि. २९ जानेवारी)  सिने नाट्य कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी  स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रसिक  प्रेक्षकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.    श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या सातव्या  राज्यस्तरीय ' अटल करंडक' एकांकिका' स्पर्धेचा शुभारंभ सन्माननीय अतिथी सु प्रसिद्ध सिने अभिनेते संजय नार्वेकर,  दिग्दर्शक व प्रसिद्ध  अभिनेता  अद्वैत दादरकर,  प्रसिद्ध अभिनेत्री  ऋतुजा  देशमुख, सिने कलाकार भरत सालवे यांच्या हस्ते आणि  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल  शा

१ फेब्रुवारीपासून सर्वांना लोकल प्रवासाची मुभा.

Image
 अत्यंत मोठी बातमी! १ फेब्रुवारीपासून सर्वांना लोकल प्रवासाची मुभा  गेल्या जवळपास वर्षभरापासून लाखो मुंबईकरांचे डोळे लागलेली ?उपनगरीय लोकल ट्रेन अखेर १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली.   मुंबई: करोनाच्या संकटामुळं गेल्या सुमारे दहा महिन्यांपूर्वी बंद झालेली व त्यानंतर मर्यादित प्रवाशांसाठी सुरू असलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा येत्या १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होणार आहे. मात्र, प्रवासाच्या वेळा मर्यादित असणार आहेत. तसं पत्र राज्य सरकारनं मध्य व पश्चिम रेल्वेला लिहिलं आहे. त्यामुळं मुंबईसह आसपासच्या शहरांत राहणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.  राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या सहीने आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागानं हे पत्र लिहिलं आहे. त्याद्वारे सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची सूचना मध्य व पश्चिम रेल्वेला करण्यात आली आहे. रेल्वेला ही सूचना करतानाच मुंबईकरांच्या सोयीसाठी मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी, असं आवाहनही सरकारनं केलं आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे-आडी मार्गावरील नादुरुस्त जावेळे पुलाला भेट देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी .

Image
  श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे-आडी मार्गावरील नादुरुस्त जावेळे पुलाला भेट देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी शेकाप नेते माजी आमदार पंडीत पाटील यांनी केली असतानाच शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने पत्र देत दळणवळणाच्या दृष्टीने त्वरीत आवश्यक तो निधी उपलब्ध करुन पूलाचे बांधकाम करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आशा पल्लवित झालेल्या ग्रामस्थांनी शेकाप नेते आ.जयंत पाटील आणि माजी आमदार पंडित पाटील यांना धन्यवाद दिले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील गालसूरे येथील गालसुरे-आडी हा पुल वडशेत वावे, साखरोने, धारवली, आडी, जावेळे, साखरी, कोंढे पंचतन या सात गावांचा दुवा आहे. या पुलामुळे या गावांतील राहणारे सुमोर साडेतीन हजार ग्रामस्थ इतर भागाशी जोडले जातात. जून महिन्यातील अतिवृष्टी दरम्यान कमकुवत झालेला हा पुल तग धरु न शकल्यामुळे कोसळला. त्यामुळे वडशेत वावे, साखरोने, धारवली, आडी, जावेळे, साखरी, कोंढे पंचतन या गावातील ग्रामस्थांचा बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटला गेला. तब्बल तीन महिने याकडे लक्ष द्यायला वेळच न मिळाल्याने या सात गावांतील ग्रामस्थांना

विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा 'अटल करंडक'.

Image
  पनवेलमध्ये राज्यस्तरीय 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धा अंतिम फेरी  शुक्रवारी उदघाटन तर रविवारी पारितोषिक वितरण समारंभ  सिने-नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांची लाभणार उपस्थिती  विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा 'अटल करंडक'   पनवेल(प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही  राज्यस्तरीय ' अटल करंडक' एकांकिका स्पर्धा होत असून या स्पर्धेच्या अंतिम फेरीला शुक्रवार दिनांक २९ जानेवारी पासून पनवेलमध्ये प्रारंभ होणार आहे.  यंदा या स्पर्धेचे सातवे वर्ष असून सिने नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांची यावेळी उपस्थिती लाभणार असून या स्पर्धेतील  विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा 'अटल करंडक' देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आज (गुरुवार, दि. २

कामगार कल्याण मंडळ, पनवेलने साजरा केला प्रजासत्ताक दिन.

Image
  मगार कल्याण मंडळ ,  पनवेलने साजरा केला प्रजासत्ताक दिन. पनवेल : कामगार कल्याण मंडळ पनवेल व पनवेल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह इस्टेट ,  पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट ली. चे अध्यक्ष ,  विजय लोखंडे जी ,  बँक ऑफ महाराष्ट्र ,  नवीन पनवेल शाखेचे अरविंद मोरे ,  बँकेचे पनवेल शाखेचे शाखा प्रबंधक ,  महेश कुऱ्हेकर ,  बँकेचे तळोजा शाखेचे शाखा प्रबंधक ,  प्रशांत वाघमारे ,  व्ही के श्रीवास्तव ,  विजयकुमार पाटील ,  उद्योजक हर्षल सूचक ,  सिद्धार्थ सूचक ,  गौरव जोशी ,  मॅनेजर डी.डी. सावंत ,  सहाय्यक निबंधक ,  सहकारी संस्था ,  श्रीमती शीतल महाले व कामगार कल्याण मंडळाचे केंद्र प्रमुख ,  प्रवीण सकट आदी मान्यवर उपस्थित होते.           कार्यक्रमाची सुरुवात विजय लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यानंतर राष्ट्रगीत होऊन मान्यवरांची भाषणे झालीत. या प्रसंगी विजय लोखंडे म्हणाले की अर्थव्यवस्था हळू हळू पूर्व पदावर आणण्यासाठी देश प्रयत्न करीत असून त्यात पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट युनिटचे सर्व सभासद हातभार लावत असल्यामुळे ह्य

गुरुवारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा.

Image
  गुरुवारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा . पनवेल(प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.  शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हि सभा होणार असून या सभेला पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. 

शुक्रवारपासून पनवेलमध्ये राज्यस्तरीय 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धा अंतिम फेरी; सिने-नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांची लाभणार उपस्थिती .

Image
  शुक्रवारपासून पनवेलमध्ये राज्यस्तरीय 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धा अंतिम फेरी  रविवारी पारितोषिक वितरण समारंभ  सिने-नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांची लाभणार उपस्थिती  पनवेल(प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या  राज्यस्तरीय ' अटल करंडक' एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीला शुक्रवार दिनांक २९ जानेवारी पासून पनवेलमध्ये प्रारंभ होणार आहे.          पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उदघाटन सकाळी ०९ वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.  तर या स्पर्धेचा पारितोषिक  वितरण  समारंभ रविवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ०५ वाजता होणार आहे.         पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी जना र्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाक