पर्यटकांच्या गाडीचा वेग आणि म्हसळ्याचे आर्थिक गणित.
पर्यटकांच्या गाडीचा वेग आणि म्हसळ्याचे आर्थिक गणित मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गापासुन २७ किमी अंतरावर आणि माणगाव-श्रीवर्धन रस्त्यावर असलेले म्हसळा सुमारे वीस हजार लोकसंख्या असलेले तालुक्याचे नैसर्गिक दृष्टीने समृद्ध, पण विकासापासून वंचित त्यामुळे अर्थिक दृष्टीने मागासलेले असलेले परंतु अर्थिक उन्नती घडवून आणण्यासाठी अनेक संधीनी युक्त असलेले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही कालावधी नंतर स्वतंत्र भारत देशात समाविष्ट झालेले एक ग्रामीण शहर.अलिकडील काळात नव्याने विकसित होणारे दिघी, आगरदांडा आणि रोहीणी बंदर तसेच दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्ग , दिवेआगर, वेळास,आदगाव,श्रीवर्धन, हरिहरेश्वर या पर्यटन नकाशावर प्रसिद्ध असणारी पर्यटन स्थळे आणि त्याचा होणारा विकास तसेच मुंबई जवळचे तिसरे विकसित होऊ पहाणारे शहर यामुळे आज म्हसळा शहराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे आज दर शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी सुमारे पाच हजार पर्यटक आणि जर जोडून सुट्या आल्या तर सरासरी दिवसाला दहा हजारापेक्षा जास्त पर्यटक म्हसळ्यातील रस्त्यावरचा धुरळा उडवत या शहरातून दिवेआगर, हरीहरेश्वर, श्रीवर्धन, वेळास,आदगाव, मुर