Posts

Showing posts from January 25, 2021

रायगड जिल्हा मध्य. सह .बँकेच्या ५९ व्या वार्षिक सर्वसाधरण सभेत बँकेचे चेअरमन आमदार भाई जयंत पाटील यांच्या शुभहस्ते कोविड योद्धा म्हणून म्हसळा तालुक्यातून खरसई ग्रामपंचायतीचे हुनहुन्नरी सरपंच श्री निलेश परशुराम मांदाडकर यांचे सत्कार.

Image
  रायगड जिल्हा मध्य. सह .बँकेच्या ५९ व्या वार्षिक सर्वसाधरण सभेत बँकेचे चेअरमन आमदार भाई जयंत पाटील यांच्या शुभहस्ते कोविड योद्धा म्हणून म्हसळा तालुक्यातून खरसई  ग्रामपंचायतीचे हुनहुन्नरी सरपंच श्री निलेश परशुराम मांदाडकर यांचे सत्कार प्रसंगी माजी आमदार पंडितशेट पाटील  अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक व्हाईसचेअरमन सुरेश खैरे साहेब . बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . प्रदिप नाईक साहेब बँकेचे संचालक श्री . संतोष पाटील . श्री तुकाराम महाडीक व  मान्यवर संचालक मंडळ उपस्थित होते .

भारतीय जनता पार्टीने म्हसळा तालुक्यात केला विकास कामांचा शुभारंभ!

Image
  भारतीय जनता पार्टीने म्हसळा तालुक्यात केला विकास कामांचा शुभारंभ!   कोरोना कमी होताच आज म्हसळा तालुकामध्ये भारतीय जनता पार्टीने तर्फे  इजिमा १२३ आडी महाड खाडी वरची वाडी रस्ता तयार करणे अंदाजित रक्कम १०.०० लक्ष, आडी जंगमवाडी शंकराच्या मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करणे ५.०० लक्ष व देवघर कोंड ते  आणि ग्रामा ६५ ते इजिमा ८१ मार्ग तयार करणे अंदा रक्कम १५.०० लक्ष या कामांचे भूमिपूजन मा.जिल्हा नियोजन सदस्य तथा सदस्य महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी मा. श्री.कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही भूमिपूजन कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आता कोरोनाचा  प्रादुर्भाव  आता कमी होत असून सर्व व्यवहार पूर्व पदावर येत आहेत.  या आपल्या ग्रामीण भागातील तरुण हा नोकरी धंद्याकरिता मुंबई व पुणे या सारख्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी गेलेला आहे पण या करोना काळात त्यांचे व्यवसाय, नोकरी,धंदे  बंद झाले आहेत . आता महानगराची परिस्थिती  फारच बदलली  आहे तेथे नोकरी व्यवसाय संधी डिजिटल व्यवहारांमुळे  कमी होत असून कोरोना काळात सर्व मुंबई व पुणे  वासी   युवक

दिनांक २३/०१/२०२१ रोजी म्हसळा तालुक्यातील पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. श्री. हसनजी मुश्रीफ साहेब तसेच जिल्ह्याचे खासदार मा. श्री. सूनिलजी तटकरे साहेब उपस्थित होते.

Image
 प्रति, मा. संपादक साहेब, रायगड मत, रायगड.  विषय - खालील बातमी आपल्या वृत्तपत्रात देण्याबाबत...! महोदय,                 दिनांक २३/०१/२०२१ रोजी म्हसळा तालुक्यातील पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी  ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. श्री. हसनजी मुश्रीफ साहेब तसेच जिल्ह्याचे खासदार मा. श्री. सूनिलजी तटकरे साहेब उपस्थित होते.                याप्रसंगी म्हसळा तालुक्यातील सर्व शिक्षणसेवकांनी एकत्र येऊन बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या शिक्षणसेवक मानधन वाढीच्या प्रश्नांच्या संदर्भात मा. श्री. हसन मुश्रीफ साहेब तसेच मा. श्री. सूनिलजी तटकरे साहेब यांना मानधन वाढीबाबत निवेदन दिले. निवेदनात बक्षी कमिटी खंड १ मधील प्रकरण २ मध्ये मुद्दा क्र. १ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केल्याप्रमाणे किमान वेतन १८००० रु. देण्याचे सुचविले आहे कारण सहाय्यक शिक्षक (परिविक्षाधीन)/ शिक्षणसेवक पदावर कार्यरत शिक्षकांना १७ मार्च २०१२ नंतर मानधन वाढ करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र सरकारने ज्या गुजरात सरकारच्या विद्यासहायक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये जी शिक्षणसेवक योजना सुरू केली त्या गुजरात सरकारने दि