Posts

Showing posts from January 23, 2021

आराठी येथील मुख्य रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लावणार - माजी आमदार पंडीतशेठ पाटील.

Image
  आराठी येथील मुख्य रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लावणार - माजी आमदार पंडीतशेठ पाटील. .. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यक्षम व गतिमान निर्णय घेणारे   माजी आमदार पंडीतशेठ पाटिल यांनी आज श्रीवर्धन तालुक्यातील विविध नागरी प्रश्नांचा आढावा घेतला,त्यामध्ये प्रामुख्याने आराठी गावातील मौहल्यातील मुख्य रस्त्याची पाहणी केली सदर रस्त्याच्या दुरावस्था तसेच नागरीकांच्या अडचणी सोडवण्याबद्दल आग्रही असल्याचे मत त्यांनी सदर प्रसंगी व्यक्त केले.सध्या रायगड जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासकामांचे प्रश्न सोडविले जात आहेत, शेतकरी कामगार पक्ष हा नेहमी सर्वधर्म समभाव या भावनेतून कार्य करत असल्याने सदर रस्त्याचा प्रश्माची आता पंडीतशेठ पाटील यांनी दखल घेतल्याने लवकर मार्गी लागणारच असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत,सदर रस्ता डांबरीकरणा संदर्भात आराठी येथील नागरिकांनी पंडीतशेठ पाटील यांची भेट घेवून नागरी प्रश्नांबाबत निवेदन दिले.यामध्ये श्री.सुलतान सोगे,माजी ग्रामपंचायत सदस्य श्री परवेझ सोगे,श्री.लोगडे तसेच अनेक नागरिक उपस्थित होते आराठी येथील रस्ता लवकरात लवकर मंजुर करण्याचे आश्वासन

म्हसळा तालुक्यातील 39 ग्राम पंचायतीच्या आरक्षण सोडतीत 20 ठिकाणचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित.

Image
 म्हसळा तालुक्यातील 39 ग्राम पंचायतीच्या आरक्षण सोडतीत 20 ठिकाणचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित. म्हसळा -वार्ताहर ग्राम पंचायत आरक्षण सोडत सन 2020 ते 2025 तालुका म्हसळा करिता 39 ग्राम पंचायतीचे आरक्षण सोडतीत अनुसुचित जाती एकुण जागा 2 पैकी एक जागा स्त्री करिता,अनुसुचित जमातीचे एकुण जागा 4 पैकी दोन जागा स्त्री करिता राखीव,नागरिकांचा मागास प्रवर्ग एकुण जागा 11 पैकी 6 स्त्री राखीव आणि सर्वसाधारण एकुण जागा 22 पैकी 11 अशा एकुण 20 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद  स्त्री करिता सोडत पध्दतीने आरक्षित झाले असल्याचे श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी अमित शेटगे यांनी जाहीर केले.म्हसळा तालुक्यातील एकुण 39 ग्रामपंचायतीत   2011 मध्ये झालेल्या जनगणने नुसार अनुसुचित जातीच्या संख्ये नुसार आरक्षण सोडत होणार असल्याचे व आळीपाळीने आरक्षण देण्यात येणार असल्याचे सांगताना न्यु इंग्लिश स्कूल म्हसळा येथे आरक्षित करण्यात आलेल्या सोडतीत  इयत्ता 6 वी चा विध्यार्थी ओमप्रसाद सुर्यवंशी याचे हस्ते चिठ्ठी काढुन त्या - त्या ग्राम पंचायतीचे सरपंचपद आरक्षण जाहीर करण्यात आले. सुरुवातीला अनुसुचित जाती आणि अनुस

धनंजय मुंडेंची बलात्काराच्या आरोपातून सुटका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया.

Image
  धनंजय मुंडेंची बलात्काराच्या आरोपातून सुटका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया. कोल्हापूर: दि, २२( आ. म ) बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेणू शर्माने आपली तक्रार मागे घेतली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.शरद पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार करणाऱ्या पीडितेने आपली तक्रार मागे घेतली अशी बातमी वाचण्यात आली आहे. पण आम्ही या प्रकरणावर चर्चा केल्यावर आम्हाला वाटलं होतं, की सत्यता पडताळली पाहिजेत. सत्यता पडताळून पाहिल्या शिवाय आपण कारवाई करू नये, अशी भूमिका आम्ही घेतली होती. हे प्रकरण गंभीर होते. परंतु, ज्यावेळी कागदपत्रातून आमच्यासमोर माहिती आली, त्यामुळे खोलात जाऊन चौकशी करण्याचा निष्कर्ष आम्ही काढला आणि आमचा हा निर्णय योग्य राहिला, असं शरद पवार यांनी सांगितले.रेणू शर्माने लेखी प्रतिज्ञापत्र देऊन तक्रार घेतली मागेपोलीस सुत्रांन

दाऊदच्या डोंगरीत घुसून धडक कारवाई, एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ.

Image
 दाऊदच्या डोंगरीत घुसून धडक कारवाई, एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढदाऊदच्या डोंगरीत घुसून धडक कारवाई, एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ. मुंबई : डॅशिंग एन सी बी अधिकारी समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे  समीर वानखेडे यांनी “डी” कंपनीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. दाऊदच्या डोंगरीत घुसून त्यांनी कारवाई केली होती. इतकंच नाही तर दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्याही आवळल्या होत्या. समीर वानखेडे यांनी डोंगरीतील ड्रग्जची फॅक्ट्री उध्वस्त केली. जी फॅक्ट्री उध्वस्त केली त्या लोकांचे अंडरवर्डशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे . करीमलालाच्या नातुलाही समीर वानखेडे यांनी अटक केली होती. एवढंच नाही तर प्रति दाऊद आरीफच्या घरात घुसून समीर वानखेडे यांनी धाड टाकली होती. समिर वानखेडेंनी दाऊदच्या साम्राज्याला थेट हात घातला. त्यामुळे समीर वानखेडेंचे सर्वच ठिकाणांहून कौतुक केलं जातंय. दोन महिन्यांपूर्वी समीर वानखेडेंसह एन सी बी च्या पथकावर हल्ला दोन महिन्यांपूर्वी २३ नोव्हेंबरला मुंबईतील गोरेगाव परिसरात ड्रग

फी वाढ संदर्भात सेंट लॉरेन्स डिसोजा स्कूल बाहेर पालकांचे निदर्शने.

Image
 फी वाढ संदर्भात सेंट लॉरेन्स डिसोजा स्कूल बाहेर पालकांचे निदर्शने. फी वाढ संदर्भात ठाण्यातील वागळे इस्टेट येथील सेंड लॉरेन्स स्कुल बाहेर पालकांनी शुक्रवारी सकाळ पासून गर्दी केली होती. याविषयावर शाळा प्रशासन व मनसेच्या ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी  मध्यस्ती करून  पालकांना समजावण्याचा प्रयत्न केला.

मुंबई – गोवा महामार्गावरील समस्या बाबतः आमदार रविंद्र पाटील यांनी केद्रिय मंत्री नितिन गडकरी यांची घेतली भेट

Image
 मुंबई – गोवा महामार्गावरील समस्या बाबतः आमदार रविंद्र पाटील यांनी केद्रिय मंत्री नितिन गडकरी यांची घेतली भेट. पेण :दि, २२ ( आ. म )      मुंबई- गोवा महामार्ग पेण विधानसभा मतदार संघातुन जात आसुन या महामार्गा लगत असणा-या गावांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या  सोडविण्यासाठी  दिल्ली येथे केंद्रीय रस्ते-विकास वाहतुक मंत्री नितिन गड़करी  यांचि पेण-सुधागड-रोहा विघानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र पाटील यांनी भेट घेतली यावेळी माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण  आमदार प्रशांत ठाकुर,आमदार महेश बालदी  उपस्थित होते,यावेळी पेण विधानसभा क्षेत्रातिल  वाशी अंडरपास टनेल, साईलिला होटेल ते वडखळ नाका येथील रोड काॅक्रिटीकरण करणे ,गडब, जिते खारपाडा,कासु,आमटेम,  अंडरपास,पेण शहर लगत हायवे समस्या, रामवाडी एग्ज़िट , या बाबत सखोल चर्चा झाली. व याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश केद्रींय मंत्री  नितिन गडकरी यांनी दिले आहेत व येथील समस्यां सोडविणार असल्याचे आमदार रविंद्र पाटील यांनी  सांगितले. @RAIGAD MAT all kinds of digital work avilable here, And also we have going to open our Raigad Institute, Gra

ओम साई राम पदयात्री कामोठे व वशेणी पायी पालखीचे साई मंदिर वहाळ येथे जोरदार स्वागत.

Image
 ओम साई राम पदयात्री कामोठे व वशेणी पायी पालखीचे साई मंदिर वहाळ येथे जोरदार स्वागत. उरण (सुनिल ठाकुर).सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा कामोठे  येथील ओम साई  राम मित्र मंडळ ची पायी पालखी दिंडी यंदा कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच पदाधिकारी व साई भक्ताना घेउन शासनाचे नियमांचे पालन करुन कामोठे  ते साई मंदिर वहाळ अशी काढण्यात आली . सदर पायी पालखी दिंडी सकाळी ५:३० वाजता  कामोठे येथील सेक्टर ६ येथील साई  मंदिरात   बाबांची आरती करुन पालखी  गावातून फिरवून दिंडीचे वहाळ कडे प्रस्थान झाले. दुपारी १२ वाजता या दिंडीचे आगमन ओवले येथील साई मंदिरात मध्यान्ह आरती करुन संध्याकाळी ६ वाजता बाबांच्या आरती करिता साई मंदिर वहाळ येथे पोहचली.संध्याकाळी पायी दिंडी पालखी साई मंदिरात पोहचल्या वर साई पालखी दिंडीचे साई देवस्थान च्या वतीने देवस्थान चे अध्यक्ष  रविंद्र का.पाटील, मा.जि.प.सदस्या पार्वती ताई पाटील, विश्वस्त  जगन पाटील यानी जोरदार स्वागत केले.  यावेळी रस्ता सुरक्षा मास हे नवी मुंबई पोलिस वाहतुक शाखेच्या वतीने अभियान पुर्ण महिना भर राबविण्यात येत आहे त्याला अनुसरुन सीबीडी बेलापुर वाहतुक शाखेचे पो.नि. शेलकर

शिवसेना व कामगारांचा आधारवड हरपला मान्यवरांनी वाहिली सूर्यकांत महाडिक यांना श्रद्धांजली.

Image
 शिवसेना व कामगारांचा आधारवड हरपला मान्यवरांनी वाहिली सूर्यकांत महाडिक यांना श्रद्धांजली, उरण : दि, २२ (घन:श्याम कडू) भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते व कामगारांचा आधारवड समजले जाणारे सूर्यकांत महाडिक यांच्या अचानक जाण्याने कधी ही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे अनेक मान्यवरांनी सांगून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.       दिवंगत कामगार नेते सूर्यकांत महाडिक यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम जेएनपीटी मल्टिपरपज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, कामगार नेते महेंद्र घरत, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, जेएनपीटी ट्रस्टी दिनेश पाटील, भूषण पाटील, माजी ट्रस्टी रवी पाटील, वकील विजय पाटील, जिप सदस्य विजय भोईर, ग्राहक कक्षाचे रमेश म्हात्रे, हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी. एन. डाकी, सुजाता गायकवाड, भावना म्हात्रे व  कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.         कामगार नेते सूर्यकांत महाडिक हे शेवटच्या क्षणापर्यंत कामगारांच्या विशेषता मराठी माणसांच्य

बनावट किसान विकास पत्र व बनावट राष्ट्रीय बचत पत्र तयार करणारी टोळी जेरबंद.

Image
  बनावट किसान विकास पत्र व बनावट राष्ट्रीय बचत पत्र तयार करणारी टोळी जेरबंद:- शहरातील एचडीएफसी बँकेत बनावट पोस्ट खात्याच्या आधारे २ कोटींचे कर्ज काढून फसवणूक करायच्या उद्देशाने आलेल्या नांदेड येथील आरोपीला पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून ४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अधिक चौकशी केली असता या टोळक्याने मुंबईसह इतरही बँकांमध्ये कोट्यवधींची कर्ज प्रकरणे दाखल केली असल्याचे समोर आली तर नेरुळ येथील विश्वास नागरी पतसंस्थेतून १२ लाख रुपयांचे कर्ज उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. सदर आरोपीपैकी मुख्य आरोपी बाबाराव गणेशराव चव्हाण (२४) हा पुर्वी भारतीय डाक विभागात नदिड येथे पोस्ट मास्तर (डाक पाल) पदावर नोकरीस होता. तेथे त्याने हेराफेरी केल्याने त्याचेवर फौजदारी कारवाई करून त्याला निलंबीत करण्यात आले होती. त्याला पोस्ट खात्याचे कामकाजाची पूर्ण माहीती असल्याने त्याने व त्याचे इतर साथीदारांसह बनावट किसान विकास पत्र व राष्टीय बचत पत्रे तयार करुन तो विविध पतसंस्था व बँकामध्ये गहाण ठेवून बदल्यात कर्ज घेवुन विविध पतसस्था व बँकांची फसवणुक केल

महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय होणार २०० बेडचे

Image
  महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय होणार २०० बेडचे. पनवेल : पनवेलचे  महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय २०० बेडचे होणार आहे. रुग्णालयात आयसीयू चे ६ बेड तर डायलेसिसचे ४ बेड  लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकुर यांनी  २२ जानेवारी रोजी बोलावलेल्या बैठकीत  देण्यात आली.     पनवेलच्या महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील कामाच्या लवकर पूर्ततेसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी दुपारी सीकेटी महाविद्यालयात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी ,रुग्णालयाचे अधिक्षक यांची संयुक्त बैठक बोलावली होती . या बैठकीला महापौर डॉक्टर कविता चौतमोल , नगरसेवक डॉक्टर अरूण भगत , सामाजिक कार्यकर्ते सतीश धारप , सार्वजनिक  बांधकाम खात्याचे उप अभियंता भोई , कनिष्ट अभियंता किशोर जाधव, रायगड जिल्हा शल्यचिकित्सक सुहास माने, पनवेलच्या महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बसवराज लोहारे, प्रशासकीय अधिकारी सुभाष जाधव ,कार्यालयीन अधीक्षक पल्लवी सावंत उपस्थित होते      यावेळी  आमदार प्रशांत