Posts

Showing posts from January 20, 2021

श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालयाचे उदघाटन

  श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालयाचे उदघाटन   पनवेल(प्रतिनिधी) श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियानाच्या पनवेल येथील कार्यालयाचे उदघाटन मकरसंक्रातीच्या शुभमुहूर्तावर (गुरुवार, दि. १४) डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, संघाचे प्रांत सहकार्यवाह शरद ओगले, प्रांत सेवाप्रमुख शिरीष देशमुख, पनवेल शहर संघचालक प्रशांत कोळी, अभियान प्रमुख राजीव बोरा, अभियान सहप्रमुख गौरव जोशी, महिला संपर्क प्रमुख स्वाती कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.            अयोध्येत प्रभु श्रीराम मंदिराला प्रारंभ झाला आहे. सर्व भारतीयांच्या सहभागाने हे भव्य 'श्रीराम मंदिर' साकारणार आहे. त्या अनुषंगाने देशव्यापी संपर्क व निधी संकलन अभियान सुरु होणार असून पनवेल नगरीतील संपर्क व निधी' संकलन कार्यालय गंगाकावेरी सोसायटी, गोदरेज प्लाझा समोर टिळक रॉड येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.                     श्री राम मंदिर निधी संकलन अभियानाद्वारे सर्व स्वयंसेवक घरोघर

दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७० वा वाढदिवस होणार भव्य आणि संस्मरणीय

Image
  दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७० वा वाढदिवस होणार भव्य आणि संस्मरणीय अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांची असणार रेलचेल  पनवेल(हरेश साठे) गोर गरीब असो व श्रीमंत सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सगळा समाज आपला कुटुंब आहे, असे मानून नेहमी मदतीचा हात देणारे दानशूर व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा ७० वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो यंदाही सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून पण त्यांच्या कार्याला साजेसा असा भव्य स्वरूपात आणि संस्मरणीय वाढदिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.         ०२ जून २०२१ रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७० वा वाढदिवस आहे. यानिमीत्त विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीत व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची पहिली बैठक पार पडली.      माणूस केवळ दौलतीने मेाठा होत नाही तर तो दानतीने आणि माणुसकीने मोठा होतो. याचे जिवंत उदाहरण म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाहिले

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : भाजपच नंबर वन - महाविकास आघाडीची बिकट तर शेकापची दयनीय अवस्था

Image
  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक :  भाजपच नंबर वन - महाविकास आघाडीची बिकट तर शेकापची दयनीय अवस्था    पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील विविध ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने  घवघवीत  यश संपादन करीत बाजी मारली आहे. विशेषतत्त्वाने अनेक वर्षांपासून शेकापक्षाच्या ताब्यातील ग्रामपंचायत भाजपच्या शिलेदारांनी काबीज करत या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत शेकापसह महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित केले. एकूणच या निकालात महाविकास आघाडीची बिकट तर शेकापची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.  गेल्या अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेल्या पालीदेवद, वाजे, खानाव, ग्रामपंचायतीत भाजपने कमालीची कामगिरी करत बाजी मारली.  त्यामुळे शेकापच्या गोटात खळबळ माजली आहे. विजयासाठी भाजपच्या त्या-त्या भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.   सर्व विजयी उमेदवारांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार

नवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री.चंद्रप्रताप प्रजापती, श्री.अरविंदपाल व श्री.राकेश रंजन यांनी नवीन पनवेल येथील साई आश्रय वृद्धाश्रम सेवाभावी संस्था येथे आयोजित केलेल्या खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाला प्रितम म्हात्रे यांनीभेट दिली व केक कापून आश्रमातील वृद्धांना भरविले तसेच खाऊ वाटप केले.

Image
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री.चंद्रप्रताप प्रजापती, श्री.अरविंदपाल व श्री.राकेश रंजन यांनी नवीन पनवेल येथील साई आश्रय वृद्धाश्रम सेवाभावी संस्था येथे आयोजित केलेल्या खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाला प्रितम म्हात्रे यांनीभेट दिली व केक कापून आश्रमातील वृद्धांना भरविले तसेच खाऊ वाटप केले.