१६ जानेवारीपासून देशभर होईल कोरोना लसीकरण... - Raigad Tourism
Breaking News - १६ जानेवारीपासून देशभर होईल कोरोना लसीकरण... नवी दिल्ली : आठवड्याभरानं अर्थात १६ जानेवारीपासून देशभरात करोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करोना लसीकरण मोहिमेसंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आलीय. पहिल्या टप्प्यात जवळपास तीन कोटी फ्रंटलाईन आणि आरोग्य कर्मचारी यांना लस दिल्यानंतर ५० वर्षांहून अधिक वयांच्या नागरिकांना तसंच एखाद्या जुन्या आजारानं त्रस्त असलेल्या ५० वर्षांहून कमी वयाच्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. पंतप्रधानांकडून या बैठकीत लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी कॅबिनेट सेक्रेटरी, आरोग्य सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन करोना योद्ध्यांना प्राथमिकता देत लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास तीन कोटी फ्रंटलाईन आणि आरोग्य कर्मचारी यांना लस दिल्यानंतर ५० वर्षांहून अधिक वयांच्या नागरिकांना तसंच एखाद्या जुन्या आजारानं त्रस्त असलेल्या ५० वर्षांहू