एक हात मदतीचा... मी मराठी प्रतिष्ठांतर्फे जसवली शाळेला पाण्याची टाकी दिली भेट




 एक हात मदतीचा... मी मराठी प्रतिष्ठांतर्फे जसवली शाळेला पाण्याची टाकी दिली भेट



श्रीवर्धन (जितेंद्र नटे) :
रायगड जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारी एकमेव सामाजिक संस्था म्हणजे मी मराठी प्रतिष्ठाण होय. सामान्य जनतेला मदत करणारी, लोकांच्या सुख दु:खात नेहमीच सहभागी होणाऱ्या या संस्थेने शाळेसाठी चांगले काम केले आहे.

3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात थैमान घातले होते. ह्यातच आपल्या विभागातील रायगड जिल्हा परिषद शाळा जसवली ता. श्रीवर्धन शाळेकडून पाण्याच्या टाकीची मागणी प्रतिष्ठाण कडे करण्यात आली होती. बरेच ठीकणी त्यावेळी नुकसान झाले होते. प्रतिष्ठानच्या वतीने थोडं सुद्धा विलंब न लावता दोन दिवसात प्रतिष्ठाण कडून पाण्याच्या टाकीची पूर्तता करण्यात आली, केलेल्या मदतीसाठी गावकरी आणि शाळेकडून प्रतिष्ठाणचे आभार मानले. अनेक लोकांनी मी मराठी प्रतिष्ठांनचे आभार मानले आहेत आणि कार्यकर्त्यांचे ही कौतुक करीत आहेत. सर्व कार्यकर्त्यांच्या या कामामुळे विभागातील नागरिक व विध्यार्थी सुखावले आहेत. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर