वाळवटी गणातून शिवसेना मुसंडी मारणार, शिवसेना शाखा प्रमुख कर्याकर्त्याची सभा.पक्ष बांधणीसाठी कार्यकर्ते एकवटले.
वाळवटी गणातून शिवसेना मुसंडी मारणार, शिवसेना शाखा प्रमुख कर्याकर्त्याची सभा.पक्ष बांधणीसाठी कार्यकर्ते एकवटले.
श्रीवर्धन- दिं १८ ऑक्टों २० २१ आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीमध्ये वाळवटी गणातून राष्ट्रवादीला जोरदार धक्का मिळणार असून शिवसेना संघटना पक्ष बांधणीसाठी कार्यकर्ते एकवटले आहेत मागिल निवडणूकीत या गणातून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते , मात्र यावेळी माजी जि. प. सदस्य अविनाष कोळंबेकर हे शिवसेनेत स्वगृही परतले आरेत त्या मुळे कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत तालुका प्रमुख प्रतोषभाई कोलथरकर यांनी पक्षबांधणीसाठी कंबरकसली असून वाळवटी गणतून कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा हक्काचा उमेदवार निवडून आणणार असा चंग बांधला आहे याच उद्देशाने विभाग प्रमुख गाजानन कदम, गणपत सोलकर.पप्पू करदेकर, शरद महाडीक,युवा सेना अधिकारी ओमकार शेलार ,यांना सभेचे आदेश देऊन सभा आयोजित करणात आली. माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलप येथिल चंडीकादेवी मंदिर सभागृह येथे वाळवटी गणातील शिवसेनेचे पदाधिकारी शाखा प्रमुख ,कार्यकर्ते यांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी पं स सभापती बाबुराव चोरगे, यांमी आपले मार्गदर्शन मनोगतपर व्यक्त,करताना आगामी काळात वाळवटी गणातून पंचायत समिती सदस्य शिवसेनाचा निवडून येण्यासाठी सर्व कार्यकर्त्यानी एकजूटीने कामाला लगून पंचायत समिती व जिल्हापरिषदेवर भगवा फडवण्यासाठी सज्ज व्हा,असे आहवन केले त्याच प्रमाणे माजी उप सभापती प्राचिताई दुदुस्कर , प्रमोद दुदुस्कर, हे शिवसेनेत पुन्हा सक्रीय झाले असून संघटनेला तालुक्यांत जोमाने कार्यरत करून विकास कामे शिवसेना पक्षच करू शकतो इतर कोणताही पक्ष विकास करू शकत नाहीअसे प्रमोद दुदुस्कर यांनी सांगितले यापुढे सभेसअविनाष कोळंबेकर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले राज्यात आघाडी सकार आहे मुख्यमंत्री आपले आहेत त्यामुळे विकास कामे होणारच म्हणूनच महाराष्द्राचे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे साहेब यांचा सर्व राज्यात क्रमांक एक चे मुख्यमंत्री आहेत मात्र आघाडी तील पालकमंत्री अदिती तटकरे रायगड जिल्हयात तटकरे कुटूंबिय राजकारण करून स्वार्थी मतलबी असून एक नंबरचे वर्चस्व दर्शविण्याचे काम करीतआहेत विकास कामांचे नारळ फोडून दिशाभूल करीत आहेत सभेच्या वेळी हे तटकरे कुटूंब वन मॅन शो करून भाषणबाजीत थापा मारतात कोणत्याही कार्यकर्त्याना जवळ करीत नसून कामा बाबत समस्या ऐकून घेत नाहीत, तटकरे कुटुबिय स्वार्थी राजकारण करतात, वाळवटी गणातून शिवसेनेचा उमेदवार विजयी होणार असा विश्वास व्यक्त करून
शिविसेना पक्ष संघटना केंव्हाही वेळी अवेळी प्रसंगाला धावून येऊन लोकांच्या समस्यासाठी झटणारा मा.बाळा साहेबांचा शिवसैनिक असतो. पुढे बोलताना त्यांनी काही काळ मी शिवसेनेतून दूर झालो होत परंतु ही चूक कधी करणार नाही असे त्यांनी सांग़ितले' बंदरमोहल्ला येथिल मुस्लीम कार्यकर्ते डॉक्टर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले शिवसेना मुस्लिम समाजाच्या विरोधात केंव्हाच नाहीं मात्र अन्य पक्ष भडकविप्याचे काम नेहमीच करीत असतात शिवसेनेत मुस्लिम समाजाला मानाचे स्थान आहे त्यामुळे साबिरभाईशेख,मंत्री होते तर अब्दुल सत्तार हे देखील शिवसेनेचे मंत्री आहेत यापुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या पालकमंत्री आदिती तटकरे फक्त दौरे करतात . येथे चक्रीवादळ सारखे अनेक संकट आले परंतु कोणत्याही गांवात त्या फिरकल्याच नाहीत असे बोलून संताप व्यक्त केला. माजी आम तुकाराम सुर्वे यांनी मार्गदर्शन करताना म्हणले सर्व शाखाप्रमुख कार्यकरर्त्यांनी कार्यरत होऊन आपल्या जबाबदारीने काम करावे सर्वांनी एकजुटीने संघटनेत कार्य करावे असे सांगितले यावेळी सभेला कुणबी समाज अध्यक्ष रत्नाकर लांबाडे सरपंच अनंत गुजर, उपसरपंच दत्ता पांढरकामे,शाखा प्रमुख,सिताराम सावंत ,बाबु सुर्वे, महीला आघाडीच्या धांदरूतताई, इंदुलकरताई विभागातील शाखा प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment