विषारी सर्प दंशाने तरूणाचा मृत्यू, श्रीवर्धन शहरातील दुर्दवी घटना.
विषारी सर्प दंशाने तरूणाचा मृत्यू, श्रीवर्धन शहरातील दुर्दवी घटना.
श्रीवर्धन -दिं १४ ऑक्टों २०२१ (मंगेश निंबरे) बारावीत शिकत असलेल्या एका तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची श्रीवर्धन शहरात दुर्दवी घटना घडली आहे या बाबत सविस्त असेश्रीवर्धन शहरातील गणेश आळी येथिल कु. रोषन सुरेंद्र चोगले वय १८ वर्षे हा दिं १३ आँक्टों २०२१रोजी रात्री जेवण करून १० : ३० वाजताच्या समारास रस्त्यावर फेरफटका मारण्या करीता गेला असता घरा पासून काही अंतरावर मुख्य रस्त्यावरुन जात होता यावेळी संपुर्ण तालुक्यात काहीकाळ विद्युत पुरवठा तांत्रिक अडचणीमुळे खंडीत झाला होता त्यामुळे रस्त्यावर अंधार होता यावेळी रोषन रस्त्यावरून चलला असताना त्याच्या पायाला विषारी सर्षाने दंश केला रोषनने वडीलांना हाक मारीत आरओरड करीत पळत आपल्या घराकडे परतला व साप चावल्याचे सांगितले वडीलांनी ताबडतोब जवळ असलेल्या उपजिल्हा रूग्णालय श्रीवर्धन येथे घेऊन गेले व दाखल केले डॉ मधुकर ढवळे यांनी त्वरीत उपचार सुरु केले मात्र उपचार सुरु असताना काही वेळातच रात्री ११ : ३० वाजताच्या सुमारास रोषन याचा मृत्यू झाला रोषन र. ना. राऊत विद्यालयात बारावी इअत्तेत शिकत होता. त्याच्या आकस्मिक निधनाने संपुर्ण तालुक्यांत हळहळ व्यक्त होत आहे तो आईवडीलां एकुलता एक होता त्याचे वडील सुरेद्र चोगले हे श्रीवर्धनमध्ये आरटी ओ विमा एजेंन्ट म्हणून कार्यरत
आहेत
Comments
Post a Comment