अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिवेआगर सुवर्ण गणेश मुर्तीचा मुखवटा पुन्हा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न.
• अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिवेआगर सुवर्ण गणेश मुर्तीचा मुखवटा पुन्हा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न.
• आजच्या सुवर्ण दिवसा मुळे दिवेआगर येथील पर्यटन क्षेत्राचा विकास होणार-- उपमुख्यमंत्री अजित पवार
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगर येथे अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुन्ह:प्रतिष्ठापना हस्ते पूजा संपन्न झाली.
दिवेआगर येथील मंदीरातील गणेशाची सुवर्ण मुर्ती ही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू होते गेल्या ९ वर्षांपूर्वी ती चोरट्यांनी चोरली होती. यावेळी दोन सुरक्षा रक्षकांना आपला जीव गमावावा लागला होता.
तेव्हापासुन दिवेआगर येथील महत्व काहीसं कमी झाल्याचे दिसून येत होते.
दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली असून त्याच्या संरक्षणासाठी आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे.
त्यामुळे जर कोणी सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची चोरी करायचा प्रयत्न केल्यास याठिकाणी असलेल्या आधुनिक यंत्रणा कार्यरत होतात. त्यामुळे कर्कश आवाजाद्वारे नागरिकांना वेळीच कल्पना मिळते व सर्व सतर्क होतात. त्यामुळे सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची चोरी होणार नाही याची प्रशासना द्वारे पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे.
तसेच यावेळी दिवेआगर येथील दोन कोटी ची नळ पाणी योजनेचा शुभारंभ व दिवेआगर पोलीस चौकीचे उद्घाटन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली आहे. याचा पर्यटक क्षेत्राला गती मिळून तेथील भागाला नक्कीच गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास स्थानिक नागरिक करत आहेत.
"' आजचा दिवस माझा व दिवेआगर नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद देणारा दिवस आहे.
सकाळपासून येथे पूजा सुरू होती. दिवेआगर सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुन्हा प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. त्यामुळे येथील लोकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला.
समस्त रायगड वासिय दिवेआगर वासिय यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
शरद पवारांना कोकण हा विभाग अत्यंत आवडतो.
येथील रेल्वे, येथील निसर्ग रम्य ठिकाण इत्यादी.
मुबई - गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी नितीन गडकरी देखील लक्ष देत आहेत. लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण करणार.
दिवेआगर सोहळ्यास मला बोलविल्याबद्दल मी आभारी आहे.
दिवेआगर मध्ये २ कोटीची नळ पाणी योजना राबविण्यात आली आहे.
येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
वादळाच्या पार्श्वभूमीवर मदत करण्याचे केंद्राचे निकष बदलणे गरजेचे आहे.
इतर राज्यांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या यंत्रणा मधील वाहक चालक यांना मिळणारा पगार येथील चालक वाहकांना मिळाला पाहिजे असे माझेही मत आहे. योग्य तो निर्णय घेण्यात येत आहेत.
त्याप्रमाणे महा विकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत.
आजच्या सुवर्ण दिवसानंतर दिवे आगार येथील पर्यटन आणखी जोमाने वाढेल.
कोकणचा विकास झालाच पाहिजे त्यासाठी मला जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
विरार मुंबई ते अलिबाग ४० हजार कोटी रुपये खर्चून १२६ किलोमीटर चा विरार अलिबाग कॉरिडॉर सुरू होत आहे.यामुळे विरार,भिवंडी पनवेल, पेण, उरण, अलिबाग असा मल्टी मोडल कॉरिडॉर आपण उभारतो आहे.
हा कॉरिडॉर जे एन पी टी, नवी मुंबई विमान तळ, नवी मुंबई न्हावा शेवा या मार्गांना जोडणारा हा नवा मार्ग विकासासाठी खुला होणार आहे.
रायगड जिल्ह्यात नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत असून जून पासून नवीन शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. त्यासाठी अदिती सतत पाठपुरावा करत असते.मी आढावा घेत असतो.
पहिली १०० मुलांची तुकडी असणार आहे.
तसेच कोकणात येणाऱ्या वेगवेगळ्या फळांवर प्रक्रिया करून त्यापासून वाईन बनविता येईल का याबद्दल प्रयत्न सुरू केले आहेत.
रायगड मध्ये सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आल्यावर मदत करताना रस्ते खराब असणे, वातावरण खराब असते, रस्ते बंद असतात. येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी एन डी आर एफ साठी बेस कॅम्प उभारण्यात येणार आहे.
रेवस पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड्डी पर्यंत ७४० किलो मीटर सागरी मार्ग काम सुरू करतोय.
९५७३ कोटी खर्चाची तरतूद केली आहे.
रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क उभारण्याचा निर्णय घेत काशीद व इतर ठिकाणी जेट्टी विकास कार्यक्रम घेतला आहे. पर्यटन विकास अष्टविनायक महड, पाली विकास साठी निधी देत आहोत.
जिल्हा आदिवासी विश्राम विभागामार्फत मॉडेल आश्रमशाळा सुरू करीत आहोत.
श्यामराव पेज आर्थिक महामंडळ मार्फत ५० कोटीची तरतूद करत आहोत.
ठाणे खाडीला समांतर सुमारे १५ किलोमीटर कोस्टल रोड तयार करतो आहोत.
न्हावा शेवा शिवडी प्रकल्प २०२२ ला पूर्ण करण्याचे ध्येय मुख्यमंत्री व महविकस आघाडीच्या सरकारने ठेवले आहे.
कोकणात निसर्ग पर्यटन धोरण जाहीर केले आहे.
अजूनही आपल्यावर कोरोना चे संकट गेलेले नाही. बरेच लोकं ही मास्क न लावताच फिरत आहेत. मला सकाळी घ्यायला आलेले सुनील तटकरे यांनी मास्क घातला परंतु अदिती तटकरे व अनिकेत तटकरे यांनी मास्क घातला नव्हता.
त्यावेळी मी त्यांना म्हणालो अरे आपल्या वडिलांकडून चांगले शिका. मास्क घाला.
आज रशियात युरोपात कोरोना रोगाचे रुग्ण वाढत आहेत. त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात वाढू नये यासाठी सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
मास्क वापरणे सक्तीचे केले आहे तरी नागरिक काळजी घेत नाहीत. जिल्हाधिकारी यांनी दोन डोस घेतलेल्यांना आपल्या कार्यालयात प्रवेश परवानगी द्यावी.
लवकरात लवकर शाळा लवकरच सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
"' असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी रायगड पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार भारत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांतील कोरोना महाभयंकर महामरीने पर्यटक स्थळ बंद केल्याने येथील स्थानिकांचा अर्थीक सोर्स खंडित झाला होता.
आता शासनाने परिस्थितीचा अंदाज घेऊन कोरोना स्थिती देखील नियंत्रणात आल्याने सर्व पर्यटक स्थळे शासनाने काही निर्बंध लाऊन चालू केली असल्याने येथील नागरिकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत
"' २४ मार्च २०१२ रोजी दुर्देवी घटना घडली व येथील पर्यटन खंडित झाले.
परंतु महा विकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे न्याय विभागाने व गृह विभागाने दिलेल्या सूचनेनुसार आज आपल्याला हा सुवर्ण दिवस पाहायला मिळाला. दादा तुमच्या हस्ते हा योग जुळून आल्याने मला मनापासून आनंद होत आहे.
दिवेआगर येथील पर्यटन वाढीला नक्कीच चालाना मिळेल असे मला नक्की खात्री आहे.
दिवेआगर मध्ये २ कोटीची नळ पाणी योजना राबविण्यात आली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील ७२ ठिकाणी पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत.
त्यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास व्यक्त करते. "' असे यावेळी अदिती तटकरे यांनी सांगितले.
"'कोकणवासीय बांधव यांकडून अजित दादा यांचे आभार. आज सुवर्ण दिवस पाहायला मिळत आहे.
महविकास आघाडी प्रत्येक वेळी कोकणाला मदत करत आहे.
येथील शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी वेळोवेळी मदत केली जात आहे.
नुसतेच पर्यटन केंद्र न बनविता कोकण शैक्षणिक हब कसे होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सढळ हाताने मदत केली आहे.
आज मला देखील हा सुवर्ण दिवस पाहायला मिळाला व मला यावेळी माझा सत्कार केला याचा तुम्हाला कधीच कमीपणा वाटणार नाही याची मी खात्री देतो
रत्नागिरी व सिंधदुर्ग जिल्ह्याला भरघोस मदत झाली पाहिजे अशी मी मागणी यावेळी मी करतो."' असे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले.
यावेळी चोरीचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणा, न्याय व्यवस्थेतील सरकारी वकील, पोलीस अधिकारी, मृत झालेले सुरक्षा रक्षक यांचे कुटुंब, सुवर्ण मुखवटा तयार करणारे कारागीर, इत्यादींचा सन्मान अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
Comments
Post a Comment