जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतकऱ्यांची नैराश्यातून आत्महत्या


जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतकऱ्यांची नैराश्यातून आत्महत्या

जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याच्या घटना आज मंगळवारी समोर आल्या आहेत. यात जळगाव तालुक्यातील बिलखेडा येथिल ६२ वर्षीय तर पाचोरा तालुक्यातील जामने (सार्वे) येथिल २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली आहे. जळगाव तालुक्यातील बिलखेडा येथे पहिल्या घटनेत माधवराव श्रावण कुंभार (वय ६२) वृध्द शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. माधवराव कुंभार हे गावात कुंभार व्यवसाय करीत होते. तसेच त्यांची शेती असून त्यात देखील ते काम करीत असत. नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. माधवराव यांच्या पश्चात पत्न, मुलगी दोन मुले असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 पाचोरा तालुक्यातील जामने (सार्वे) येथिल तरुण शेतकरी राहुल राजेंद्र पाटील (वय २६) याने कपाशीचे अपेक्षित उत्पन्न आल्याने नैराश्यातून आत्महत्या केली. राहुल पाटील यांनी वडीलांकडूनच पाच एकर शेती कसण्यासाठी घेतली होती. त्यात कपाशीचे पीक लावले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे पिक वाया गेले. केलेला खर्च देखील मिळाला नाही. वाया गेले. केलेला खर्च देखील मिळाला नाही.

 ही परिस्थिती उद्भवल्यानंतर आता वडीलांना पैसे कसे द्यायचे घर कसे चालवायचे अशा विवंचनेतून त्यांना नैराश्य आले होते. त्यातून त्यांनी शेतातीलच शेड मध्ये गळफास घेत आत्महत्या केली. राहुल पाटील यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, अडीच वर्षाची मुलगी भाऊ असा परीवार आहे.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर