तलावांच्या नंतर विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे यांचा मोर्चा शहरातील गार्डन कडे" "गार्डन मधील निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल अधिकाऱ्यांना धरले धाऱ्यावर..."
तलावांच्या नंतर विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे यांचा मोर्चा शहरातील गार्डन कडे"
"गार्डन मधील निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल अधिकाऱ्यांना धरले धाऱ्यावर..."
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या समोरच असलेले महात्मा गांधी उद्यानातील सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आज विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका सौ.सारिका भगत यांनी उद्यानाला भेट दिली. उद्यानात प्रथम गेल्यानंतर श्री.प्रितम म्हात्रे यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करताना पुतळ्या भोवती जमलेले जाळे त्यांच्या निदर्शनास आले असता त्यांना राग अनावर झाला त्यांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला त्यानंतर पुढे सदर उद्यानात टेंडर मधील कामानुसार आवश्यक असलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे हे त्यांनी अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले. येथे लावण्यात आलेले मार्बल व्यवस्थित फिटिंग झालेले नाहीत . उद्यानामध्ये सुरक्षारक्षक असतानासुद्धा सर्व परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला निदर्शनास आला याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आणि याचा अर्थ तेथील सुरक्षा रक्षकांच्या कामांवरती पुन्हा एकदा त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. तसेच त्यानंतर सदर उद्यानात कंत्राटदाराकडून टाकण्यात आलेली माती ही नियमानुसार नव्हती ती काँक्रीटच्या वरतीच अर्धा इंची पेक्षा कमी लाल माती फक्त दाखवण्यात पुरती पसरविण्यात आली आहे हे त्यानी अधिकार्यां च्या निदर्शनास आणले. अशा प्रकारच्या बऱ्याचशा त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. त्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना सदर कंत्राटदाराला बोलावून घेऊन सर्व काम नियमानुसार करून घेण्याचे निर्देश दिले आणि पुन्हा काही दिवसांनी काम झाल्यानंतर या उद्यानाचा पाहणी दौरा करण्याचे ठरवले.
याच प्रकारे साईनगर येथे 2019 साला पासून सुरु असलेल्या गार्डन प्लॉटवर चे काम सुद्धा पाहणी करण्यासाठी तेथे गेले असता तेथे गेल्या दोन महिन्यापासून वीजपुरवठा खंडित झालेला होता हे त्यांच्या निदर्शनास आले. वीजपुरवठा नसल्यामुळे झाडांना पाणी घालण्यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून घेतलेल्या बोरिंग चे पाणी झाडांना टाकता येत नसल्यामुळे बर्यााचशा ठिकाणची झाड ही सुकून गेली होती. लाखो रुपये खर्च करून तेथे उभारण्यात आलेले लॉन आणि झाडे संपूर्ण सुकत होते. तसेच त्या उद्यानात लहान मुलांसाठी लावण्यात आलेली खेळणी सुद्धा काही महिन्यांपूर्वी चोरी करण्यात आली आहेत . या चोरी संदर्भात सुद्धा पनवेल महानगर पालिकेने काय पाठपुरावा केला याचा जाब प्रितम म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. तसेच या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी नव्याने लावण्यात आलेले नागरिकांसाठी चे इ टॉयलेट बंद अवस्थेत आढळून आले. सदर नागरिकांसाठी लावलेले टॉयलेट कोणाच्या उद्घाटनासाठी ठेवले आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

नागरिकांसाठी देण्यात आलेला सुखसुविधा फीटिंग झाल्यानंतर आपण युद्धपातळीवर सुरू करून नागरिकांना लोकार्पण का करत नाही अनेक वर्षे हे उद्यान येथे दिसत आहे. परंतु नागरिकांना त्याचा लाभ मिळत नाही. सदर उद्याना संदर्भात राहिलेल्या त्रुटी आणि आवश्यक ती कामे त्वरित पूर्ण करून सदर उद्यान नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्धार यावेळी विरोधी पक्षनेते श्री.प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकीकडे शहरातील सत्ताधारी पुढारी उद्घघाटना मध्ये व्यस्त आहेत. आणि दुसरीकडे विरोधी पक्ष जुनी उद्घघाटने झालेल्या कामांवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सोयीसाठी पुढाकार घेत आहे अशा प्रकारची चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळाली.
Comments
Post a Comment