गुरुवारी खारघरमध्ये 'दिवाळी पहाट' - शुक्रवारी पनवेलमध्ये दिवाळी पहाट स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल

 


गुरुवारी खारघरमध्ये 'दिवाळी पहाट' 

पनवेल (प्रतिनिधी) खारघरवासियांच्या खास आग्रहास्तव भारतीय जनता पार्टी खारघर- तळोजा मंडलाच्यावतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक ०४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६ वाजता खारघरमध्ये 'सुश्राव्य गाण्याची सुरेल मैफल अर्थात दिवाळी पहाट २०२१' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
          खारघर सेक्टर १२ मधील ग्रीन फिंगर शाळेजवळील गावदेवी मैदानात हि सुरेल मैफिल होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी खारघर- तळोजा मंडलाच्यावतीने करण्यात आले आहे. 

शुक्रवारी पनवेलमध्ये दिवाळी पहाट
स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल 

पनवेल (प्रतिनिधी) रसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा मोर्चा पनवेलच्यावतीने शुक्रवार दिनांक ०५ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६ वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल 'दिवाळी पहाट' या सुमधूर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
         सोनेरी पहाट आणि सुरांची सुरेल बरसात असे दिवाळी पहाटचे  एक अनोखे नाते आहे. मराठी-हिंदी भावस्पर्शी गाण्यांनी दिवाळीची पहाट सुरेल करण्याची परंपरा जपायला मराठी रसिकांना आवडते. त्यामुळे दिवाळी पहाटेचा हा अनुभव पुढील अनेक दिवसांसाठी नवा उत्साह देणारा ठरतो. त्या अनुषंगाने सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. दिवाळी पहाटचे हे पाचवे वर्ष आहे. दर्जेदार कार्यक्रम तसेच उत्तम नियोजनामुळे सदरच्या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांची गर्दी होत असते, त्यामुळे या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रवेशिका आवश्यक अनिवार्य असून प्रवेशिका नि:शुल्क आहे. अधिक माहिती व निःशुल्क प्रवेशिकांसाठी चिन्मय समेळ (८७६७१४९२०३), अभिषेक भोपी (९८२०७०२०४३), रोहित जगताप (८६९१९३०७०९), गौरव कांडपिळे (९९२०८६८००८), आकाश डोंगरे (९९३०३१९८३२) किंवा सिद्धार्थ मोहिते (८८७९२१६६६९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पनवेल शहरात वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाने पनवेलच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. आणि हा दिवाळी पहाट कार्यक्रम त्या ठिकाणी प्रथमच होत असल्याने रसिकांच्या मनात कार्यक्रमाची उत्सुकता भरली आहे.  

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर