नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत पनवेल गुन्हे शाखेकडून घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या
नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत पनवेल गुन्हे शाखेकडून
घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या
नवी मुंबई / जितेंद्र नटे
raigadmat@gmail.com
नवी मुंबई आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष ०२ कडून घरफोडी करणाऱ्या इसमास अटक करण्यात आली. सराइत गुन्हेगार अब्दुल सईदबकरीदि खान, वय ३५ यास अटक करून कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सदर आरोपी हा रात्रीच्या वेळी दुकानाचे शटर उचकटून घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार आहे. आरोपी कडून १३,२२,४१९ रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. गेली अनेक दिवस तळोजा, खारघर, पनवेल नवी मुंबई येथे घरफोडी व दुकाने फोडण्याचा तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त श्री. बिपीनकुमार सिंह, नवी मुंबई मा. सह पोलीस आयुक्त श्री. डॉ. जय जाधव, मा. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. महेश घुर्ये मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, श्री. सुरेश मेंगडे, मा. सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, श्री. विनोद चव्हाण, यांनी आढावा घेऊन घरफोडीच्या गुन्ह्याच्या लक्ष केंद्रित करून ते उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेच्या सर्व शाखांना व सर्व पोलीस स्टेशनला सूचना दिल्या होत्या.
वारिष्टयांच्या सुचनेचे पालन करीत घटण्या घडलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीधर गोरे यांचे नेतृत्वाखाली सपोनि. प्रवीण फडतरे, पोउपनि. वैभवकुमार रोंगे, पोना अजिनाथ फुंदे यांनी तांत्रिक तपास, गुन्हे अभिलेख, गुन्हे करण्याची कार्यपद्धतीचा अभ्यास करून २१ गुन्हे नोंद असलेल्या सराईत गुन्हेगाराने केले असल्याचे लक्षात आले.
लागलीच पोलीस कामाला लागले. मिळालेल्या गुप्तमाहितीच्या आधारे चोराचा माग काढत सापाळा लावण्यात आला आणि नेमका या सापळ्यात सराईत गुन्हेगार फसला. तळोजा येथे हा आरोपी येत असताना त्याची सकूटर एम.एच. ४७ यू ३८६६ डिक्कीमध्ये ठेवलेल्या सामानासहित त्याला पकडले. आरोपी अब्दुल सईदबकरीदि खान, रा. फुटरोड, १५ नंबर गल्ली, साईबाबा मंदिराच्या बाजूला, मंडल मानखुर्द, मुंबई येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याने एकूण ३५ घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे.
सदरच्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याने जनतेमधून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे व आभार मानण्यात येत आहे. या प्रकरणाचे तापासाम्यान गुन्हे कक्ष ०२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीधर गोरे यांचे नेतृत्वाखाली सपोनि प्रवीण फडतरे, सपोनि संदीप गायकवाड, पौउनि. वैभव रोंगे, पौउनि.मानसिंग पाटील, पोना/४४१३ अजिनाथ फुंदे, सफो सुदाम पाटील, पोहवा. १७३२ अनिल पाटील, पोहवा १०३४ ज्ञानेश्वर वाघ, पोहवा/१३३९ प्रशांत काटकर, पोहवा/१९३ रनजीत पाटील, पोहवा/४४ तुकाराम सूर्यवंशी, पोहवा/१९३० राजेश बेकर, पोहवा/२७०० सुनील कुदळे, पोना./१७३८ दीपक डोंगरे, पोना २००५ सचिन म्हात्रे, पोना २०२२ रुपेश पाटील, पोना,/२०८२ इंद्रजित कानू, पोना/२२५६ राहुल पवार, पोना./२३३४ प्रफुल्ल मोरे, पोशी/१२५९३ संजय पाटील, पौषी/३५७७ प्रवीण भोपी, पौषी ४३१७ विक्रांत माळी, पोहवा १५५० जगदीश तांडेल, पोशी ३५४१ नंदकुमार धागे, पोशी ३६२५ अभय मे-या यांनी लक्षपूर्वक कामगिरी केली.
सतर्क पोलीस,! नवी मुंबई पोलीस ! म्हणून नावलौकिकच असलेलया मुंबई पोलिसांच्या कामगिरीबद्दल सध्या जनतेमध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोरोनाचा फायदा घेत अनेक गुन्हेगारांनाही डोके वर काढले आहे मात्र पोलीस से कोई बच नही सकता.... हे पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांनी दाखवून दिले आहे. तरीही सावधान रहे सतर्क रहे । असे नागरिकांना सांगायला नवी मुंबई पोलिसांनी विसरले नाहीत.
@jitendra nate
Check Link for Raigad Mat Live News
- रायगड मत (जितेंद्र नटे)
Comments
Post a Comment